सेनेत संघटनात्मक फेरबदल सावंत यांचा भार हलका तुमाने यांच्याकडे भंडारा, गोंदिया: कन्हेरे सहसंपर्कप्रमुख
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:23+5:302015-02-20T01:10:23+5:30
नागपूर : शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले असून पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्यांच्याकडे फक्त नागपूर शहर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांची भंडारा आणि गोंदिया जिल्ाचे संपर्कप्रमुख म्हणून तर किशोर कन्हेरे यांची गडचिरोली व नागपूरचे सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

सेनेत संघटनात्मक फेरबदल सावंत यांचा भार हलका तुमाने यांच्याकडे भंडारा, गोंदिया: कन्हेरे सहसंपर्कप्रमुख
न गपूर : शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले असून पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्यांच्याकडे फक्त नागपूर शहर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांची भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून तर किशोर कन्हेरे यांची गडचिरोली व नागपूरचे सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.राज्यात सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेने पक्षबांधणीवर लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सेनेच्या मंत्र्यांनी जिल्हावार दौरे केले. त्यानंतरच्या टप्प्यात संपर्क व सहसंपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवीन नियुक्त्या करताना मंत्रिपद सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्यांच्याकडे पूर्वी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे फक्त नागपूर शहर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली. उर्वरित चार जिल्ह्यांपैकी भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांची जबाबदारी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे तर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याची जबाबदारी हिंगणघाटचे माजी आमदार अशोक शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी नागपूरचे किशोर कन्हेरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे नागपूर शहर सहसंपर्क प्रमुख पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. कन्हेरे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते. त्यांना आता शहर सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्त करण्यात आली. पुढील दोन वर्षात नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर कन्हेरे यांना देण्यात आलेली नवीन जबाबदारी महत्त्वाची ठरते. गुरुवारी त्यांनी डॉ. दीपक सावंत यांची रविभवन येथे भेट घेतली. (प्रतिनिधी)