शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप ५० वा स्थापना दिन : ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

By admin | Updated: June 20, 2016 00:22 IST

जळगाव : शिवसेनेच्या ५० व्या स्थापनादिनानिमित्त रविवार १९ रोजी बळीराम पेठ शाखेतर्फे गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

जळगाव : शिवसेनेच्या ५० व्या स्थापनादिनानिमित्त रविवार १९ रोजी बळीराम पेठ शाखेतर्फे गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
बळीराम पेठ भागातील शिवसेनेचे विभागप्रमुख विपीन पवार, उपविभागप्रमुख जितेंद्र गवळी, शाखाप्रमुख ललित भोळे यांच्या उपस्थितीत रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी पाणपोईचे नूतनीकरण तसेच इयत्ता दहावी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गरजु ५० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी गजानन पाटील, शहर संघटक हेमराज चव्हाण, उपशहरप्रमुख विलास भदाणे, युवासेनेचे उपशहर प्रमुख विपिन पाटील, उपशाखाप्रमुख निर्भय पाटील, हिमांशु भदाणे, निशांत रतवेकर, मयुर विरपनकर, रूपेश पाटील, जितेंद्र पाटील, चारुदत्त पाटील, महेंद्र राजपूत, सनी सोनार उपस्थित होते.

नशिराबाद येथे प्रतिमापूजन
नशिराबाद येथे शिवसेनेच्या ५० व्या स्थापनादिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष विकास धनगर, दगडू माळी, विनायक धर्माधिकारी, चेतन बर्‍हाटे, कैलास नेरकर, बंडू रत्नपारखे, विजय वाणी, महेंद्र कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)