बलात्कार पीडितेसोबतचा सेल्फी महागात

By Admin | Updated: July 1, 2016 06:13 IST2016-07-01T06:13:52+5:302016-07-01T06:13:52+5:30

बलात्कार पीडितेसोबत सेल्फी घेणे राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सौम्या गुर्जर यांना महागात पडले

Selfie expensive rape victim | बलात्कार पीडितेसोबतचा सेल्फी महागात

बलात्कार पीडितेसोबतचा सेल्फी महागात


जयपूर : बलात्कार पीडितेसोबत सेल्फी घेणे राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सौम्या गुर्जर यांना महागात पडले असून, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी फैलावर घेतल्यानंतर गुरुवारी त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बुधवारी महिला पोलीस ठाण्यात जाऊन बलात्कार पीडितेची भेट घेतली होती. तेव्हा
आयोगाच्या सदस्य गुर्जर त्यांच्यासोबत होत्या. पीडितेची विचारपूस करतेवेळी गुर्जर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेतले. या वेळी जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने गुर्जर पीडितेसोबत सेल्फी घेत असतानाची दोन छायाचित्रे टिपली.
ती व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला.
या छायाचित्रात गुर्जर आयपॅडद्वारे सेल्फी घेताना दिसत असून,
त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आहे. अध्यक्ष सुमन शर्मा यांनीही सेल्फीसाठी मान झुकविल्याचे व पीडित महिला या दोघींच्या मध्ये असल्याचे दिसते. (वृत्तसंस्था)
>रेकॉर्डसाठी सेल्फी
रेकॉर्डसाठी म्हणून मी छायाचित्रे घेतली होती. याचा मुद्दा का बनवला जातोय हेच समजत नाही.
- सौम्या गुर्जर
मी पीडितेशी बोलत असताना कधी सेल्फी घेतले गेले मला ठाऊक नाही. मला हे रुचलेले नाही. मी याबाबत त्यांच्याकडे लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.
- अध्यक्ष सुमन शर्मा

Web Title: Selfie expensive rape victim