शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीने घेतला जीव, नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 15:46 IST

सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू झाला. दोन्ही तरुणी आंध्रप्रदेशच्या राहणा-या होत्या.

कोरापूट (ओडिशा) - सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू झाला. दोन्ही तरुणी आंध्रप्रदेशच्या राहणा-या होत्या. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. एका तरुणीचं नाव ज्योती (27) असून ती विशाखापट्टणमची राहणारी होती, तर दुसरी तरुणी श्रीदेवी (23) विजयनगरची रहिवासी होती. 

दोन्ही तरुणी विशाखापट्टणम येथून पर्यटनासाठी आल्या होत्या. एकूण नऊ जणी पर्यटनासाठी आल्या होत्या. नागाबली येथील पुलावर या सर्वजणी फिरत होत्यात त्यानंतर काहीजणी फोटो काढण्यासाठी खाली नदीत उतरल्या. नदीतील एका दगडावर उभं  राहून फोटो काढत असताना तोल गेल्याने ज्योती आणि श्रीदेवी पाण्यात पडल्या आणि वाहून गेल्या. बचाव पथक आणि स्थानिकांच्या मदतीने दोन्ही तरुणींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं आहे. 

रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू, सेल्फी काढण्याच्या नादात गमावला जीव ?रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बंगळुरुमधील बिदादी येथे घडली आहे. राजधानीपासून 30 किमी अंतरावर ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी ही शक्यता वर्तवली असून, अपघात झाला तेव्हा तरुण नेमके ट्रेनपासून किती अंतरावर होते याचा अंदाज लावला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला. दोन तरुणांची ओळख पटली आहे. बंगळुरुमधील नॅशनल कॉलेजमध्ये ते शिकत होते. काही वेळापुर्वी तिघे मित्र बंगळुरुजवळील अॅम्यूजमेंट पार्कात गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन आठवड्यांमध्ये सेल्फीमुळे मृत्यू होणारी बंगळुरुमधील ही दुसरी घटना होती. 

मित्र बुडत असताना बाकीचे बाजूला उभे राहून काढत होते सेल्फी बंगळुरुत एक 17 वर्षीय तरुण सेल्फीचा बळी ठरला होता. जेव्हा तरुण तलावात बुडत होता तेव्हा तिथेच तलावात मजा मस्ती करणारे मित्र मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते. सेल्फी काढण्याकडे लक्ष नसतं तर कदाचित आपला मित्र बुडत असल्याचं त्यांना कळलं असतं, आणि जीव वाचवला असता. 17 वर्षीय तरुण नॅशनल कॉलेजचा विद्यार्थी होता. बंगळुरुपासून 40 किमी अंतरावर असणा-या रामनगर जिल्ह्यातील कनकपूरा येथे ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचं नाव विश्वास असून दक्षिण बंगळुरुमधील हनुमंता नगर येथे तो राहायचा. त्याचे वडील गोविंदराजू ऑटोरिक्षा चालक असून त्याची आई सुनंगा गृहिणी आहे.

टॅग्स :Selfieसेल्फीDeathमृत्यू