निवड सुयश
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30
साहिल दिवानी

निवड सुयश
स हिल दिवानीफोटो - स्कॅनराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एलएलबी (५ वर्ष) च्या सातव्या सेमिस्टरमध्ये साहिल दिवानी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे. ते रायसोनी लॉ स्कूलचे विद्यार्थी आहेत. विजय केवलरामाणीफोटो - स्कॅनसिंधी समाजाताली बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले प्रा. विजय केवलरामाणी यांची भारतीय जनता पक्षाच्या नागपूर महानगर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जान्हवी कडूफोटो - स्कॅननारायणा विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी विजय कडू हिने राजस्थान येथे झालेल्या सीबीएसई नॅशनल रोलर स्केटिंग स्पर्धेत दोन रजत पदक पटकाविले आहे. तर राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत दोन कास्य पदक पटकाविले आहे. भारत रेहपाडे दीपक नागपुरेफोटो - स्कॅनशिक्षक भारती नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्षपदी भारत रेहपाडे व सचिव पदावर दीपक नागपुरे यांची निवड करण्यात आली आहे. चारुता भाकरे फोटो - स्कॅनराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे चारुता भाकरे (जोशी) यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ. किशोर महाबळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्या श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अशोक पवारफोटो - स्कॅनविदर्भ साहित्य संघ, शाखा वर्धा व यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली आहे. अमीर साहबफोटो - स्कॅनमहाराष्ट्र भाजपा अल्पसंख्यक आघाडीचे अध्यक्ष अमीर साहब यांची महाराष्ट्र शासनाने राज्य अल्पसंख्यक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अभिनव लांडगेफोटो - स्कॅनभारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत स्वामी गजानन इंग्लिश हायस्कूलचा ८ व्या वर्गाचा विद्यार्थी अभिनव लांडगे याने उत्तम गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.