निवड-सुयश जोड....
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:05+5:302015-08-02T22:55:05+5:30
पद्मिनी दुरुगकर-घोसेकर

निवड-सुयश जोड....
प ्मिनी दुरुगकर-घोसेकरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कला विद्याशाखेतर्फे पद्मिनी चंद्रशेखर दुरुगकर-घोसेकर यांना पीएच. डी. प्रदान केली. त्यांना डॉ. प्रतिभा खिरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय डॉ. शरयू तायवाडे यांना दिले आहे.कृष्णराव हिंगणकरअखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी कृष्णराव हिंगणकर यांची नियुक्ती महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. हिंगणकर यांच्या नियुक्तीचे ईश्वर बाळबुधे, चरण चोपकर, विनोद प्रकाशे आदींनी स्वागत केले आहे.हरिकिसन राठीऑक्ट्राय फ्री झोन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या वतीने नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यकारिणीत ज्येष्ठ पत्रकार हरिकिसन राठी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. किशोर देवघरेदादा रामचंद्र बाखरू सिंधू महाविद्यालयातील प्रा. किशोर नारायण देवघरे यांना वाणिज्य शाखेतर्फे पीएच. डी. प्रदान केली. त्यांना डॉ. संजय कवीश्वर यांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी डॉ. एस. सी. गुल्हाने, डॉ. आर. के. चाम, डॉ. महेंद्र वंजारी यांना दिले आहे.