जलयुक्त शिवारसाठी २२२ गावांची निवड कृती आराखड्यानुसार कामे : विभागातील ९०० गावांचा समावेश
By Admin | Updated: December 18, 2015 00:28 IST2015-12-18T00:28:51+5:302015-12-18T00:28:51+5:30
जळगाव : टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ातील प्रस्तावित गावांपैकी २२२ गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागातील ९०० गावांमध्ये नियोजनबद्धरीत्या कृती आराखडा राबविण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवारसाठी २२२ गावांची निवड कृती आराखड्यानुसार कामे : विभागातील ९०० गावांचा समावेश
ज गाव : टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ातील प्रस्तावित गावांपैकी २२२ गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागातील ९०० गावांमध्ये नियोजनबद्धरीत्या कृती आराखडा राबविण्यात येणार आहे.टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्यात हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची एक बाब म्हणून एकात्मिक पद्धतीने नियोजनबद्धरीत्या कृती आराखडा तयार करून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान ही योजना राबविण्याबाबत शासनाने आदेश केला होता. या अभियानातंर्गत नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात ९४१ गावांची निवड करण्यात आली होती. व त्यानुसार निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये कामे करण्यात येत आहेत. ही कामे मार्च २०१६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.जलयुक्त अभियानात सन २०१६/१७ या वर्षाकरिता टंचाईमुक्त करण्यासाठी नाशिक विभागासाठी ९०० गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यात जळगाव जिल्ातील २२२ गावे, नाशिक जिल्ातील २१८, धुळे जिल्ातील २२३, नंदुरबार जिल्ातील ६९ तर अहमदनगर जिल्ातील २६८ गावांचा समावेश आहे.