भाजपाकडून सीमा भोळे यांचे नाव आघाडीवर

By Admin | Updated: February 29, 2016 22:03 IST2016-02-29T22:03:05+5:302016-02-29T22:03:05+5:30

(महापौर निवडणूक बातमी जोड)

Seema Bhole's name is leading the BJP | भाजपाकडून सीमा भोळे यांचे नाव आघाडीवर

भाजपाकडून सीमा भोळे यांचे नाव आघाडीवर

(म
हापौर निवडणूक बातमी जोड)
महापौरपद निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांची बैठक सोमवारी दुपारी पद्मालय विश्रामगृहावर आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात कोण इच्छुक आहे? अशी विचारणा करतानाच निवडणुकीसाठी खर्चही करावा लागतो. संख्याबळाचे गणितही जुळवावे लागेल. त्यासाठी कोणाची तयारी आहे का? अशी विचारणा करण्यात आली. मात्र त्यावर कोणीच काही न बोलल्याने प्रकाश बालाणी यांनी सीमा भोळे यांनाच उमेदवारी द्यावी, असे सुचविले. त्यावर याबाबत पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे निि›त करण्यात आले. उपमहापौरपदाबाबत मात्र भाजपाच्या बैठकीत काहीही चर्चा झाली नाही. तर राष्ट्रवादीला पद नको असल्याने उपमहापौरपदाबाबत प्रश्नचिन्ह आहे.

आणखी दोघे इच्छुक
या बैठकीत स्वत:च्या उमेदवारीबद्दल कोणीही दावा केलेला नसला तरीही भाजपाचे विरोधी पक्षनेते वामनराव खडके, गटनेते डॉ.अश्विन सोनवणे यांच्यासारखे ज्येष्ठ नगरसेवकही इच्छुक आहेत. पालकमंत्र्यांकडील बैठकीतच ते आपल्या उमेदवारीसाठी दावा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Seema Bhole's name is leading the BJP