शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

मजुरांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा कडक; ८७ व्या दिवशीही बाजारपेठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 02:51 IST

चुकीच्या धोरणांमुळे परिस्थिती बिघडली -काँग्रेसचा आरोप

श्रीनगर : कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पाच मजुरांची हत्या केल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर ८७व्या दिवशी, बुधवारीही काश्मीरमधील बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूकसेवा बंद राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

दहशतवाद्यांना अटकाव करण्यासाठी सुरक्षा दलांची फ्लाइंग स्क्वाड तैनात करण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अधिकदक्षता बाळगण्यात येत आहे. बिगरकाश्मिरींवर हल्ल्यांचे दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा जवान सज्ज झाले आहेत. काश्मीरमध्ये मंगळवारी अनेक ठिकाणी जमाव हिंसक झाला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत काही जण जखमी झाले आहेत.बाजारपेठा बंद असल्याने फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र गेले दोन दिवस फेरीवाल्यांनीही आपला व्यवसाय बंद ठेवला आहे. मात्र १० वी व १२वीच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडल्या. काश्मीरमध्ये लँडलाइन व पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू झाली असली तरी इंटरनेट सेवा अद्यापही बंदच आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पाच मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी जखमी झालेल्या एका मजूरावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहे, असे पोलिसांनी सांगितले. हा मजूर मरण पावल्याचे चुकीचे वक्तव्य पोलिसांनी आधी केले होते. 

सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवा : काँग्रेसनरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमधील स्थिती आणखी बिघडली आहे, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर चौधरी यांनी बुधवारी केली आहे. काश्मीरमध्ये नेमकी स्थिती काय आहे हे सरकार जनतेपासून दडवू पाहत आहे.पाच लाख भरपाईकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या पाच मजूरांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. या हल्ल्यामागचे खरे सत्य काय आहे याचा कसून शोध घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मजुरांच्या हत्येचा ममता बॅनर्जी व राज्यपाल धनखर यांनी निषेध केला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370