शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'सैन्यदलातील कपात म्हणजे सुरक्षेशी तडजोड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 06:36 IST

राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता या शीर्षकाखाली एकापाठोपाठ एक असे तीन ट्वीट करून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली.

नवी दिल्ली : ‘भारतीय सैन्यदल जगातल्या ५ मोठ्या सैन्यदलांपैकी एक आहे. इतकेच नव्हे तर देशाविषयी समर्पणाची भावना अन् संरक्षण सिद्धतेबाबत विशेष कौशल्याचे व कार्यक्षमतेचे दर्शन या सैन्यदलाने साऱ्या जगाला वेळोवेळी घडवले आहे, अशा सैन्यदलाबद्दल प्रत्येक भारतीयाला गर्व व अभिमान आहे. आता खर्च कमी करण्यासाठी सैन्यदलात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा केंद्र सरकारचा जो प्रस्ताव चर्चेत आहे, तो राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा आहे, अशा आशयाचे तीन ट्वीट भाजपचे बंडखोर खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी केले.प्रसारमाध्यमातील ज्या वृत्तांशी संबंधित हे ट्वीट शत्रुघ्न सिन्हांनी केले, त्या बातम्यांमध्ये ५ ते ७ हजार कोटींच्या संरक्षण खरेदीसाठी सैन्यदलात सुमारे दीड लाख जवानांची मोठी कपात करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे नमूद केले होते. संरक्षण व्यवस्थेवर होणारा अफाट खर्च कमी करण्याबाबत असा तर्क मांडला गेला की, भारतीय संरक्षण व्यवस्थेसाठी सध्या १.२ लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यातला ८३ टक्के खर्च केवळ संरक्षण व्यवस्थेचा महसुली खर्च (एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट) व सैन्यदलाचे वेतन यासाठी खर्च होतो. सैन्यदलाला मिळणाºया बजेटपैकी फक्त १७ टक्के म्हणजे २६ हजार ८२८ कोटी संरक्षण सिद्धतेसाठी लागणाºया साधनसामग्रीवर खर्च होतो. या बजेटवर सैन्यदल अगोदरच नाराज आहे. आगामी काळात सैन्यदलात व्यापक कपात करून जे ३१ हजार ८२६ ते ३३ हजार ८२६ कोटी हाती येतील त्यातून ५ ते ७ हजार कोटींच्या शस्त्रास्त्रांची खरेदी भारताच्या संरक्षणासाठी करण्याचा सरकारचा इरादा आहे. याच वृत्तावर सिन्हा भडकले व राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता या शीर्षकाखाली एकापाठोपाठ एक असे तीन ट्वीट करून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया नोंदवली.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्यासह शहादरा येथे सफाई मजुरांना विशेष संदेश देण्यासाठी आयोजित सरकारी कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा गेले तेव्हा भाजप कार्यर्क्त्यांनी काळे झेंडे दाखवून सिन्हांचा जोरदार निषेध केला. वाजपेयी मंत्रिमंडळात शत्रुघ्न सिन्हा मंत्री असताना शहादराचे विद्यमान जिल्हाधिकारी त्यांचे वैयक्तिक सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळीत होते.मी बोलतो ती ‘दिल की बात’भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या निषेध घोषणांच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मन की बात’ करण्याचे पेटंट काही माझ्यापाशी नाही. मी जे काही बोलतो ती दिल की बात असते. देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती वाढत असल्यामुळे जनता निराश आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गॅसच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. इंधनाचे भाव आकाशाला भिडले आहेत, सैन्यदलात कपात करण्याचा प्रस्ताव तर धक्कादायक आहे. अशा वेळी इतरांना सल्ले देण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या मंत्रिमंडळावर होणाºया खर्चात कपात का करीत नाही.’

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा