शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा दलाने दोन दिवसांनंतरच घेतला बदला, एसपीओंच्या हत्येत सहभागी असलेल्यासह ४ दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 11:03 IST

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. शोपियान  येथील ड्राच परिसरात झालेल्या पहिल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले.

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. शोपियान  येथील ड्राच परिसरात झालेल्या पहिल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. तर दुसरी चकमक सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झाली. यात शोपियानच्या मुलू परिसरात दहशतवादी ठार झाला. 

दहशतवाद्याचा  विशेष पोलीस अधिकारी जावेद दार यांच्या हत्येत सहभाग 

या चकमकीची माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करुन दिली. या चकमकीत एक स्थानिक दहशतवादी मारला गेला. ड्राच येथील चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख हनान बिन याकूब आणि जमशेद अशी आहे.पुलवामा येथे विशेष पोलीस अधिकारी जावेद दार यांच्या हत्येत त्यांचा हात होता. या दहशतवाद्यांनी २ ऑक्टोबर रोजी जावेद दार आणि २४ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालमधील एका मजुराची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीपूर्वी जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद

पोलिसांना शोपियानच्या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षा दलाने परिसराला घेरल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार झाला,सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. यात तीन दहशतवाद्यांना मारले गेले.दुसऱ्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव नसीर अहमद भट, शोपियान येथील नौपोरा बास्कुचन असे आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एक एके रायफलसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

अमित शाह यांच्या रॅलीपूर्वी जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू आणि राजौरी दौरा झाला. काल शाह यांची रॅली राजौरी येथे झाली. या रॅलीपूर्वी जम्मू आणि राजौरी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान इंटरनेटचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली.

शाह यांच्या या रॅलीपूर्वी जम्मू-काश्मीरचे डीजी जेल एचके लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यांची हत्या घरातील नोकराने केल्याचा संशय आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शाह