शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित रेल्वे; 166 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एकाही प्रवाशचा झाला नाही अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:34 IST

रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे अशी गोष्ट

नवी दिल्ली -  गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून 2018-19 हे वर्ष रेल्वेसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुरक्षित वर्ष ठरले आहे. रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण वर्षभरात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. तसेच रेल्वे अपघातांमध्येही लक्षणीय घट झालेली आहे.  या संदर्भातीली आकडेवारी रेल्वेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. एकेकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन, क्राँसिंगमधील गोंधळ, आग लागणे, गाडी रुळावरून घसरणे अशा अपघातांमुळे प्रवाशांना जीव गमवावा लागत असे. मात्र आता अशा अपघातांमध्ये 95 टक्क्यांनी घट झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये भारतीय रेल्वेच्या कार्यकक्षेत 73 अपघात झाले होते. मात्र यावर्षी या अपघातात अजून घट होऊन तो आकडा 59 वर आला आहे.  सुरुवातीच्या वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे प्रमाण लक्षणीय होते. तसेच त्यावेळी रेल्वे अपघातांमध्ये जीवितहानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत होती. 1990 ते 1995 या पाच वर्षांच्या काळात सुमारे 2 हजार 400 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2013 ते 2018 या काळात सुमारे 990 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.  दरम्यान, रेल्वेने अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला असला तरी मुंबईतील लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी यात गृहित धरलेली नाही. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत