मोहीम फत्ते करून गुप्त यान परतले
By Admin | Updated: October 19, 2014 02:39 IST2014-10-19T02:39:45+5:302014-10-19T02:39:45+5:30
तब्बल दोन वर्षे अंतराळातून पृथ्वीभोवती घिरटय़ा घालणारे अमेरिकेचे मानवरहित अंतराळ विमान (स्पेस क्राफ्ट) पृथ्वीवर परतले.

मोहीम फत्ते करून गुप्त यान परतले
कॅलिफोर्निया (वँडेनबर्ग वायूदल तळ) : तब्बल दोन वर्षे अंतराळातून पृथ्वीभोवती घिरटय़ा घालणारे अमेरिकेचे मानवरहित अंतराळ विमान (स्पेस क्राफ्ट) पृथ्वीवर परतले. शुक्रवारी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किना:यावरील वायुदलाच्या तळावर उतरलेले हे एक्स-37-बी अंतराळ विमान छोटय़ा अंतराळयानासारखेच दिसते. हे अंतराळ विमान शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.24 वाजता हवाई दलाच्या वँडेनबर्ग तळावर उतरले.
हे गुप्त अंतराळ विमान (ऑर्बिटल टेस्ट व्हेईकल) 674 दिवस पृथ्वीच्या कक्षेत होते. डिसेंबर 2क्12 मध्ये आखण्यात आलेल्या गुप्त मोहिमेतहत हे विमान अंतराळात धाडण्यामागचा नेमका काय उद्देश होता, याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या गुप्त अंतराळ विमानातून अंतराळात काही वैज्ञानिक उपकरणो पाठविण्यात आली होती. या मोहिमेमागे जेम्स बाँडच्या रहस्यपटाचाही दाखला देत दुस:याप्रकारेही कारणमीमांसा केली जात आहे. दुस:या देशांच्या उपग्रहावर किंवा चीनच्या अंतराळ प्रयोगशाळेवर या गुप्त अंतराळ विमानातून नजर ठेवली जात होती, असेही सांगितले जाते. तथापि, अमेरिकेच्या वायुदलाने लेखी निवेदन जारी करून हे गुप्त अंतराळ विमान पृथ्वीच्या कक्षेत प्रयोगासाठीच पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. बोईंग या कंपनीने तयार केलेल्या दोन विमानांपैकी हे एक असून अशा प्रकारची ही तिसरी मोहीम होय. (वृत्तसंस्था)
42.9 मीटर उंच आणि 9 मीटर लांबीचे हे अंतराळ विमान असून पंख्याचा आकार 4.5 मीटर आहे. या विमानाचे वजन 4,989 किलोग्रॅम असून त्यावर सौर तावदानेही आहेत.
4पुढच्या वर्षीही फ्लोरिडातील केप कॅनाव्हेरल तळावरून अशीच चौथी मोहीम हाती (एक्स-37-बी) घेण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या वायुदलाने सांगितले आहे.