रिना मित्रा अंतर्गत सुरक्षा विभागाच्या सचिव

By Admin | Updated: January 24, 2017 03:50 IST2017-01-24T03:50:18+5:302017-01-24T03:50:18+5:30

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रिना मित्रा यांची गृहमंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली

Secretary of the Security Department under Rina Mitra | रिना मित्रा अंतर्गत सुरक्षा विभागाच्या सचिव

रिना मित्रा अंतर्गत सुरक्षा विभागाच्या सचिव

नवी दिल्ली : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रिना मित्रा यांची गृहमंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या सीमा सुरक्षा दलाच्या विशेष महासंचालक आहेत. त्या मध्यप्रदेशच्या १९८३ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. एम. के. सिंगला हे या महिनाअखेर निवृत्त होत असून] त्यांच्या जागी मित्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, विदेश सचिव एस. जयशंकर यांना २८ जानेवारी २०१८ पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ २८ जानेवारी रोजी संपणार होता, तसेच आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनाही ३१ मे २०१७ पर्यंत तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: Secretary of the Security Department under Rina Mitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.