शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादमधील हॉटेलमध्ये राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात गुप्त बैठक, गुजरात निवडणुकीबाबत खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 20:12 IST

गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

अहमदाबाद -  गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून  या बैठकीच्या वृत्ताचे खंडन करण्यात येत आहे. तसेच हार्दिक पटेलच्या सहकाऱ्यांनीही अशाप्रकारच्या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे.अहमदाबादमध्ये राहुल गांधी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे सहकारी जातानाची सीसीटीव्ही चित्रफीत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. त्याच हॉटेलमधील एका खोलीत राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सध्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने दोघांमध्ये निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  दरम्यान,  हार्दिक पटेलच्या सहकाऱ्यांची फोडाफोडी करणाऱ्या  भाजपाला आज डबल झटका बसला होता.  नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आज निखिल सवानी यांनीही भाजपाची साथ सोडली. आज सकाळी निखिल सवानी यांनी पत्रकारांशी बातचीत करताना भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले होते. मला फक्त लॉलिपॉप ऑफर केला जात असून, आश्वासन पूर्ण केलं जात नसल्याने राजीनामा देत असल्याचे निखिल सवानी बोलले. विशेष म्हणजे नरेंद्र पटेल यांच्याप्रमाणेच निखिल सवानी हेसुद्धा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचे निकटवर्तीय आहेत. निखिल सवानी यांच्याआधी नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकला होता. यावेळी नरेंद्र पटेल यांनी गौप्यस्फोट करत भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक खुलासा केला. ''यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते'', असा खळबळजनक आरोप नरेंद्र पटेल यांनी केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपाला घरचा अहेर दिला. मात्र निखिल सवान यांनी आपल्याला पैशांची ऑफर देण्यात आली नव्हती असं स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :GujaratगुजरातElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधी