शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णो देवीच्या भक्तांसाठी खूशखबर, दिल्ली-कटारा मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 09:12 IST

वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दिल्ली ते कटरा हे अंतर केवळ 8 तासांचे होणार आहे.

नवी दिल्ली : माता वैष्णो देवीच्या भक्तांसाठी एक खूशखबर आहे. देशातील सर्वात अत्याधुनिक आणि वेगवान एक्स्प्रेस दिल्ली ते कटारा मार्गावर धावणार आहे. पुढील महिन्यापासून दिल्ली ते कटारा मार्गावर वंदे भारत चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली ते कटरा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. माता वैष्णो देवीच्या यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दिल्ली-कटारा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

130 किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दिल्ली ते कटरा हे अंतर केवळ 8 तासांचे होणार आहे. सध्याच्या स्थितीत हे अंतर कापण्यासाठी 12 तासांचा कालावधी लागतो. तसेच, वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केल्यानंतर यात्रेकरुंच्या मागणीनुसार आणखी फेऱ्या वाढविण्यात येतील, असेही सुत्रांनी सांगितले. 

दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस सुरुवातीला आठवड्याला सोमवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे. त्यानंतर यात्रेकरुंची मागणी लक्षात घेऊन आठवड्यातील पाच दिवस सुरु करण्यात येईल. वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते कटरा स्थानकापर्यंत तीन महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. दिल्ली नंतर अंबाला जंक्शन, लुधियाना, जम्मू नंतर कटरा पोहोचणार आहे.  

(वंदे भारत एक्स्प्रेसचा वेगळाच असेल थाट! ही वैशिष्ट्ये आहेत खास)

वंदे भारत एक्स्प्रेस ची वैशिष्ट्ये....- 'मेक इन इंडिया' योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.- चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी १८० किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते.- कितीही वेगानं धावली तरी प्रवाशानं भरून ठेवलेली पाण्याची बाटलीही कलंडणार नाही, इतकी या रेल्वेची स्थिरता असेल, असा दावा करण्यात आलाय.- १६ डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे.- या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल.- या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल.- रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालये. - रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि 'अ‍ॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स' असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल.- रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील.- जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल.- प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील.- सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील.- ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.- आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल.- रेल्वेत १६ चेअरकार डबे असतील. त्यातील १४ डबे 'नॉन एक्झिक्युटिव्ह' तर दोन डबे 'एक्झिक्युटिव्ह' असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे ७८ आणि ५६ असेल.- 'एक्झिक्युटिव्ह' क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNew Delhiनवी दिल्लीrailwayरेल्वे