विदर्भ-भंडारा पोलीस राज्यात द्वितीय
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:06+5:302015-02-13T00:38:06+5:30
भंडारा पोलीस राज्यात द्वितीय

विदर्भ-भंडारा पोलीस राज्यात द्वितीय
भ डारा पोलीस राज्यात द्वितीयगुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी : जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुराभंडारा : जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध व अन्य गुन्ह्यांमध्ये भंडारा पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण व दोष सिद्धीमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. २०१३-१४ या वर्षात गुन्हे प्रकटीकरणात ही कौतुकास्पद कामगिरी नोंदविण्यात आल्याने जिल्हा पोलीस विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध एकूण १७६२ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी १२८७ गुन्हे उघडकीला आणण्यात भंडारा पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. हे प्रमाण ७३ टक्के असून महाराष्ट्रात गुन्हे प्रकटीकरणात भंडारा पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहे. चोरी गेलेल्या मालमत्तेपैकी ६७.८४ टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. खुनाची एकूण २० प्रकरणे दाखल करण्यात आली असून १८ गुन्हे उघडकीला आणण्यात यश मिळाले. खुनाच्या प्रयत्नात एकूण १७ गुन्ह्यांपैकी १६ गुन्हे उघडकीला आले आहेत. चालू वर्षात ३६५ आरोपींना शिक्षा झालेली आहे. (प्रतिनिधी)