शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असलं तरीही दुसरं लग्न मान्य- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 17:38 IST

सर्वोच्च न्यायालयानं घटस्फोटासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं घटस्फोटासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. हिंदू मॅरेज अॅक्टनुसार पहिल्या पत्नीपासून घेतलेल्या घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास पती किंवा पत्नी दुसरं लग्न करू शकत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयामध्ये मोठा बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असेल आणि तुम्हाला दुसरं लग्न करायचं असल्यास तुम्हाला तसं करता येणार आहे. न्यायालयानं घटस्फोटाचं प्रकरण प्रलंबित असल्यास दुसरं लग्न करण्याची मुभा दिली आहे. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठानं हिंदू मॅरेज अॅक्ट 15नुसार हा निर्णय दिला आहे. घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना पतीने पहिल्या पत्नीशी समझोता करत खटला मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. याचदरम्यान त्याने दुसरे लग्नही केले. उच्च न्यायालयाने त्याने केलेलं दुसरं लग्न बेकायदेशीर ठरवले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळत पतीनं केलेलं दुसरं लग्न वैध ठरवलं आहे.दिल्लीतल्या तीस हजारी न्यायालयानं 31 ऑगस्ट 2009मध्ये पत्नीच्या बाजूनं निर्णय देताना घटस्फोटाचा निर्णय मान्य केला होता. त्यानंतर पतीनं या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. परंतु त्याच दरम्यान पती-पत्नीमध्ये समझोता झाला. 15 ऑक्टोबर 2011मध्ये पतीनं घटस्फोटाचं अपील मागे घेण्याचा अर्ज केला. विशेष म्हणजे न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही पतीनं दुसरं लग्न केलं. या प्रकरणानंतर पहिल्या पत्नीनं पुन्हा न्यायालयात अर्ज केला. घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असल्यामुळे माझ्या पहिल्या पतीनं केलेलं दुसरं लग्न मान्य करू नये, अशी न्यायालयाला विनंती केली. परंतु कनिष्ठ न्यायालयानं पत्नीचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पहिली पत्नी उच्च न्यायालयात गेली, त्यावेळी उच्च न्यायालयानं पत्नीच्या बाजूनं निर्णय दिला. परंतु या निर्णयविरोधात पतीनं पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय