‘बॉम्ब नौकेच्या मलब्याचा शोध सुरू

By Admin | Updated: January 4, 2015 01:51 IST2015-01-04T01:51:00+5:302015-01-04T01:51:00+5:30

स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेबाबतचे गूढ कायम असतानाच, या नौकेचा मलबा शोधण्याची मोहीम तटरक्षक दलाने हाती घेतली आहे़

'Searching for the ship boat search | ‘बॉम्ब नौकेच्या मलब्याचा शोध सुरू

‘बॉम्ब नौकेच्या मलब्याचा शोध सुरू

गांधीनगर : गुजरातेतील पोरबंदरच्या खोल समुद्रात भारतीय तटरक्षक दलाकडून पाठलाग सुरू असतानाच, स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेबाबतचे गूढ कायम असतानाच, या नौकेचा मलबा शोधण्याची मोहीम तटरक्षक दलाने हाती घेतली आहे़ नौकेसह समुद्रात जलसमाधी मिळालेल्या कथितरीत्या त्या चार अतिरेक्यांच्या मृतदेहांचाही शोध सुरू आहे़ हे मृतदेह हाती लागल्यास नौकेचे गूढ उकलण्यात मोठी मदत मिळू शकते़
शनिवारी येथे तटरक्षक दलाचे कमांडर (उत्तर पश्चिम) कुलदीपसिंह शेयोरन यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली़. समुद्रात एक नव्हे तर दोन नौका होत्या, याबाबतच्या वृत्ताबाबत विचारले असता, अशी कुठलीही माहिती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले़
कुलदीपसिंह शेयोरन यांनी या संपूर्ण घटनाक्रमाबाबत तपशीलवार माहिती दिली़ त्यांनी सांगितले
की, स्फोटांनी लादलेल्या नौकेवर
टी-शर्ट आणि हाफपॅन्टमधील
चौघेही मच्छिमार भासत नव्हते़ त्यांच्याकडे मासेमारीचे जाळेही नव्हते़ नौकेवरील चौघैही अतिरेकी होते का, याचा अनेक गुप्तचर संस्था एकत्र येऊन याचा तपास करीत आहेत, असे ते म्हणाले़

मिळाली होती सूचना
च्३१ डिसेंबरला सकाळी ८.३० आठच्या सुमारास आम्हाला संशयित नौकेबाबत गुप्तचर सूचना मिळाली.
च्टेहेळणीसाठी डोरनियर विमान आणि जहाज रवाना.
च्दुपारी १ वाजता संशयित नौका दृष्टिपथात
च्मध्यरात्री भारतीय जहाज‘राजरतन’ नौकेजवळ.
च्आत्मसमर्पण करण्याऐवजी नौकेवरील दिवे बंद व पलायनाचा प्रयत्न
च् सुमारे दीड तास तिचा पाठलाग व अखेरीस तटरक्षक दलाकडून गोळीबार
च्नौकेतील लोकांकडून आग व आत्मघाती स्फोट.
च् त्यांना नौकेसह जलसमाधी

 

Web Title: 'Searching for the ship boat search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.