सर्वोपचारमधून पळालेल्या मनोरुग्ण महिलेचा शोध

By Admin | Updated: May 9, 2015 01:44 IST2015-05-09T01:44:47+5:302015-05-09T01:44:47+5:30

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेली वाशिम जिल्‘ातील मनोरुग्ण महिला रुग्णालयातून फरार झाली. या प्रकाराची तक्रार महिलेच्या मुलाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.

The search for a psychiatric woman escaped from caretaker | सर्वोपचारमधून पळालेल्या मनोरुग्ण महिलेचा शोध

सर्वोपचारमधून पळालेल्या मनोरुग्ण महिलेचा शोध

ोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेली वाशिम जिल्‘ातील मनोरुग्ण महिला रुग्णालयातून फरार झाली. या प्रकाराची तक्रार महिलेच्या मुलाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.
वाशिम जिल्‘ातील कार्ली येथील रहिवासी बेबी चिंतामन जाधव (४५) ही महिला मानसिक आजारी आहे. तिच्यावर उपचार करण्यासाठी गत बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सोबत आलेल्या महिलेसोबत रुग्णालयाच्या आवारात फिरत असताना बेबी जाधव ही महिला सोबतच्या महिलेचा हात सोडून रुग्णालयातून पळून गेली आहे. या संदर्भात सदर महिलेचा दोन दिवस शोध घेण्यात आला, मात्र ती कुठेही न आढळल्याने या प्रकरणाची तक्रार किशोर जाधव यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात केली असून, पोलिसांनी मनोरुग्ण महिलेचा शोध सुरू केला आहे.

Web Title: The search for a psychiatric woman escaped from caretaker