शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींसाठी नव्या बंगल्याचा शोध सुरू, पुन्हा पंतप्रधान न झाल्यास करावी लागते व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 04:31 IST

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही दिवसच शिल्लक असताना नगरविकास मंत्रालयाने निवडणुकांनंतरच्या स्थितीसंदर्भात काम सुरू केले आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : पुन्हा आम्हीच सत्तेत येऊ व नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा दावा भाजपा करीत असली, तरी लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही दिवसच शिल्लक असताना नगरविकास मंत्रालयाने निवडणुकांनंतरच्या स्थितीसंदर्भात काम सुरू केले आहे.पंतप्रधान मोदी यांच्यासाठी या मंत्रालयाने दिल्लीच्या लुटियन भागात बंगला शोधणे सुरू केले आहे. माजीपंतप्रधानांना टाइप-आठ पद्धतीचा बंगला दिला जातो. त्यामुळे मंत्रालयाने तसे काही बंगले निश्चित केले आहेत. प्रथेनुसार हे काम करावे लागते. मोदींऐवजी अन्य कोणी नेता पंतप्रधान झाल्यास मोदींच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी ते केले जात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आतापर्यंत जे दोन बंगले निश्चित केले. त्यापैकी कृष्ण मेनन मार्गावरील ६-ए हा बंगला आधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना देण्यात आला होता. वाजपेयी यांच्या निधनानंतर तो बंगला रिकामा करण्यात आला आहे. याखेरीज जनपथवरील ९ क्रमांकाचा बंगलाही पाहिला आहे. दहा वर्षे हा बंगला रिकामा आहे. या शेजारीच यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवासस्थान असून, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो कोणालाही देण्यात आला नव्हता. तुघलक मार्गावरील एक बंगला पाहिला असून, तो बऱ्याच काळापासून शरद यादवांकडे आहे. ३0 जानेवारी मार्ग व अकबर मार्गावरील बंगलेही पाहून ठेवले आहेत. त्यापैकी एक जम्मू-काश्मीर सरकारकडे आहे.मोदी यांच्याखेरीज अन्य नेता पंतप्रधान झाला, तरच मोदींना यापैकी एखादा बंगला त्यांच्या पसंतीनुसार दिला जाईल. त्यांनी मंजुरी दिलेल्या बंगल्याची नंतर दुरुस्ती केली जाईल वा त्यात आवश्यक ते बदल केले जातील. अर्थात, नवा नेता पंतप्रधान होईपर्यंत मोदी जनकल्याण मार्गावरील पंतप्रधानांसाठी असलेल्या निवासस्थानी राहतील.>चुकीचा अर्थ लावला जाऊ नयेएका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा याचा अर्थ लावणे चुकीचे आहे. आम्हाला प्रत्येक निवडणुकीच्या आधी हे काम करावेच लागते. आयत्या वेळी पंचाईत होऊ नये, यासाठी आम्हाला हे काम प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या आधी करावे लागते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी