पाच गाळे केले सील

By Admin | Updated: March 23, 2017 17:16 IST2017-03-23T17:16:43+5:302017-03-23T17:16:43+5:30

राहुरी : राहुरी नगर परिषदेने वेळेत थकबाकी न भरणार्‍या पाच गाळेधारकांचे गाळे मंगळवारी सील केले़ मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कर चुकवेगिरी करणार्‍यांना गाळे सील करून चपराक दिली़

Sealed five slots | पाच गाळे केले सील

पाच गाळे केले सील

हुरी : राहुरी नगर परिषदेने वेळेत थकबाकी न भरणार्‍या पाच गाळेधारकांचे गाळे मंगळवारी सील केले़ मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कर चुकवेगिरी करणार्‍यांना गाळे सील करून चपराक दिली़
राहुरी शहरातील व्यापारी वेळेत कर भरीत नसल्याने राहुरी नगर परिषदेने कारवाईचे पाऊल उचलले़ बँड कार्यालय, धान्य दुकान, सलून, भंगार दुकान, रेडीओ दुरूस्ती दुकान यांचे गाळे सील करण्यात आले़ राहुरी नगर परिषदेचे कर्मचारी काकासाहेब शिरसाट, राजेश पवार, संतोष डागवाले, एकनाथ जगधने, सोमनाथ लोखंडे, भाऊसाहेब ढोकणे, बाबा गंुजाळ, राजू खंगले यांनी हे गाळे सील करून कारवाई केली़

Web Title: Sealed five slots