दोन बंगल्यांना सील

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:39+5:302015-01-30T21:11:39+5:30

Seal the two bungalows | दोन बंगल्यांना सील

दोन बंगल्यांना सील

>- कर विभागाची कारवाई : चार भूखंडही जप्त
नागपूर : थकीत असलेला मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कर विभागाने मोहीम हाती घेतली आहे. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पथकाने कारवाई करीत दोन बंगले सील केले व चार भूखंड जप्त केले. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे.
लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने कर वसुलीसाठी शुक्रवारी नऊ मालमत्तांवर वारंट कारवाई केली. यापैकी सहा मालमत्ता जप्त करण्यात आल्या. मौजा सोनेगाव येथील राहाटे यांच्या मालकीचा मेघदुत विला येथील बंगला क्ऱ ३३ वर २ लाख ५८ हजार रुपये कर थकीत आहे. सुरेंद्र झा यांच्या मालकीच्या बंगला क्ऱ ३४ वर ४ लाख ५७ हजार रुपये कर थकीत आहे. वारंवार नोटीस देऊनही कर भरण्यात आला नाही. त्यामुळे दोन्ही बंगले जप्त करण्यात आले. मौजा सोनेगाव येथील बृहन नागपूर सोसायटी येथील अनिता तागडे यांचा भूखंड क्ऱ ४४ व ४५ वर एक लाख रुपयांचा कर थकीत आहे. नारायण सावळे यांच्या भूखंड क्रमांक ५४ वर ३८ हजार रुपये, मौजा खामला नागभूमी सोसायटी येथील रामराव मतकर भूखंड क्रमांक २७ वर एक लाख रुपये कर थकीत आहे. त्यामुळे संबंधित चारही भूखंड जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता धारकांनी सात दिवसात कर न भरल्यास संबंधित मालमत्तेचा लिलाव करून मालमत्ता विक्रीद्वारे बकाया कर वसुल केला जाईल, असा इशारा कर विभागाने दिला आहे.
याशिवाय वारंट कारवाई करीत मद्रास किचन रामदासपेठ यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये, वार्ड क्ऱ ७४, घर क्ऱ १२९४/८ मधुकर पाटनकर, जयताळा यांच्याकडून ७६ हजार रुपये, नीलेश क्षीरसागर यांच्याकडून ५० हजार रुपये, वसूल करण्यात आले. ही कार्यवाही लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक काथवटे, धानोरकर, कापगते, शेगोकर, जिवने, धनकर, पध्ंाराम, वाहन चालक तायवाडे यांनी केली.

Web Title: Seal the two bungalows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.