हत्तींच्या मार्गावरील हॉटेल, विश्रामगृहे तत्काळ सील करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 05:26 IST2018-08-10T05:25:49+5:302018-08-10T05:26:03+5:30
तामिळनाडूतील मोहक निळसर निलगिरी पर्वतराजातीत गजराजांचा वावर आणि वर्दळ असलेल्या भागातील बेकायदेशीर ११ हॉटेल आणि पर्यटन विश्रामगृहे ४८ तासांच्या आत सीलबंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारने दिले आहेत.

हत्तींच्या मार्गावरील हॉटेल, विश्रामगृहे तत्काळ सील करा
नवी दिल्ली : तामिळनाडूतील मोहक निळसर निलगिरी पर्वतराजातीत गजराजांचा वावर आणि वर्दळ असलेल्या भागातील बेकायदेशीर ११ हॉटेल आणि पर्यटन विश्रामगृहे ४८ तासांच्या आत सीलबंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारने दिले आहेत.
न्या. मदन बी. लोकूर यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने या भागातील हॉटेल आणि पर्यटन विश्रामगृहांच्या मालकांना संबंधित दस्तावेज मंजुरीसाठी २४ तासांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत.