शहरं
Join us  
Trending Stories
1
"'मी गौमांस खातो, कोण मला आडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवण करतायेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
2
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
5
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
6
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
7
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
8
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
9
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
10
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
11
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
12
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
13
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
14
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
15
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
16
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
17
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
18
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
19
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
20
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:55 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथून पकडण्यात आलेला बोगस आयएएस अधिकारी गौरव कुमार सिंह उर्फ ललित किशोर याचे धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. त्याने एका एसडीएमनां मारहाण केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर त्याच्या ४ गर्लफ्रेंड असून, त्यापैकी ३ जणी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथून पकडण्यात आलेला बोगस आयएएस अधिकारी गौरव कुमार सिंह उर्फ ललित किशोर याचे धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. त्याने एका एसडीएमनां मारहाण केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर त्याच्या ४ गर्लफ्रेंड असून, त्यापैकी ३ जणी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

एमएससीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गौरव कुमार सिंह ऊर्फ ललित किशोर हा कोचिंग शिक्षक बनल. मात्र काही तरी मोठं करण्याची इच्छा असल्याने तिथे तो रुळला नाही. त्याचदरम्यान, त्याने बनावट आयएएस अधिकारी बनून रुबाब दाखवण्याचा आणि कोट्यवधी रुपये लाटण्याची जबरदस्त योजना आखली. एकीकडे तो क्लासमध्ये शिकवत होता, तर दुसरीकडे आपला आयएएसचा प्रोटोकॉल मेंटेन करण्यासाठी भलीमोठी रक्कम खर्च करायचा. याचदरम्यान, त्याने चार गर्लफ्रेंडसुद्धा पटवल्या.

गौरव कुमार सिंह ऊर्फ ललित किशोर हा पांढऱ्या इनोव्हा कारवर लाल-निळ्या बत्त्या लावून गावात फिरायचा. एकदा तो बिहारमधील भागलपूर परिसरात गेला असताना त्याची भेट एका खऱ्या एसडीएमशी झाली. त्यावेळी बॅच आणि रँकबाबत त्यांनी गौरवला काही प्रश्न विचारले. त्यामुळे संतापलेल्या गौरवने त्यांच्यावर दोन थपडा मारल्या. आश्चर्याची बाब म्हणजे एसडीएम यांनी याची कुठे तक्रारही केली नाही.

दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणूक सुरू असताना गोरखपूर पोलिसांनी पकडण्यात आलेल्या ९९ लाख रुपयांच्या तपासादरम्यान बनावट आयएएस अधिकारी गौरव कुमार सिंह ऊर्फ ललित किशोर याला अटक केली. दरम्यान, त्याच्या एकूण चार गर्लफ्रेंड असून, त्यापैकी तिघीजणी ह्या गर्भवती असल्याची माहिती तपासामधून उघडकीस आली.

भूमिगत असताना त्याने एका तरुणीसोबत प्रेमाचं नाटक करून तिच्यासोबत मंदिरात लग्न केलं. त्यानंतर मेहुणा अभिषेक याच्या मदतीने लोकांना नोकरी आणि सरकारी ठेके देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा सुरू केला. यादरम्यान, त्याने सोशल मीडियावर आयएएस अधिकाऱ्याची बनावट प्रोफाईल सुरू केली. तसेच तरुणींशी मैत्री करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांना त्याच्या मोबाईलमधून बरेच चॅट सापडले आहेत. त्यामधून त्याच्या चार गर्लफ्रेंड असून, त्यापैकी तिघीजणी गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र या तरुणींना गौरव हा बनावट आयएएस अधिकारी असल्याची आणि विवाहित असल्याची काहीही माहिती नव्हती. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी