कागदपत्रांची छाननी सुरुच

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:03+5:302014-12-20T22:27:03+5:30

आयकर कारवाई दुसर्‍या दिवशीही सुरुच

Scrutiny of documents | कागदपत्रांची छाननी सुरुच

कागदपत्रांची छाननी सुरुच

तूर: लातूर शहर महापालिकेच्या स्विकृत सदस्यपदी डॉ़ प्रभुदास दुप्ते यांनी संधी देऊन काँगे्रसकडून त्यांना नाताळची भेट देण्यात आली आहे़ तर स्थायी समितीवर सदस्यपदी डॉ़ विजय अजनीकर व शाहेदाबी शेख यांची निवड करण्यात आली आहे़ स्विकृत सदस्याठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यावर छाननीसाठी जवळपास १ तास लागल्याने डॉ़ दुप्ते यांना अर्ज बाद होणार, अशीच चर्चा सभागृहात रंगली होती़ मात्र, तासाभरात मनपाच्या मतदार यादीत त्यांचे नाव असल्याचे आढळून आल्यावर आयुक्तांनी प्रभुदास दुप्ते यांच्या नावाची घोषणा केली़
काँग्रेसचे स्विकृत सदस्य रविंद्र पाठक यांनी राजीनामा दिल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती़ शिवाय, स्थायी समितीच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या़ या जागांवर नव्या सदस्यांची निवड करण्यासाठी शनिवारी महापौर अख्तर शेख यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती़ यावेळी महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, आयुक्त सुधाकर तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी स्विकृत समिती सदस्यांसाठी नामनिर्देशनपत्र मागविण्यात आले़ अर्ज दाखल करण्यासाठी अर्धा तासांचा वेळ देण्यात आला असताना काँग्रेसकडून डॉ़ प्रभुदास दुप्ते यांचा अर्ज गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी दाखल केला़ या अर्जावर राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेश स्वामी, राजा मणियार यांनी आक्षेप घेतल्याने जवळपास एक तास छाननीसाठी वेळ घालविण्यात आल्यावर आयुक्तांनी तो अर्ज वैध ठरवून स्विकृत सदस्य म्हणून डॉ़ प्रभुदास दुप्ते यांच्या नावाची घोषणा केली़
स्थायी समितीच्या १५ पैकी २ जागा रिक्त होत्या़ दोन्ही जागा काँग्रेसच्या कोट्यातील असल्याने डॉ़ विजय अजनीकर व शाहेदाबी जमील शेख यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड जाहिर करण्यात आली़ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अपक्ष नगरसेवक डॉ़ विजय अजनीकर यांना स्थायी समितीच्या सदस्यत्वाची संधी मिळाली आहे़ स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी, यासाठी काँगे्रसमधील बड्या नगरसेवकांनी फिल्डिंग लावली होती़ मात्र, ऐनवेळी विजय अजनीकर, शाहेदाबी शेख यांची नावे पुढे आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला़
विशेष सभेत स्विकृत सदस्य निवडीअगोदर एकुण पक्षीय बलाबल किती, गेल्या सहा महिन्यांपासून अनुपस्थित असलेल्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद् करण्यात का आले नाहीत, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला़ तर संत गाडगेबाबा यांचा स्मृती दिन असतानाही मनपात त्यांना अभिवादन करण्यात आले नसल्याचा आक्षेप काँग्रेसचे लक्ष्मण कांबळे, रिपाइचे गटनेते चंद्रकांत चिकटे यांनी घेतला़ यावर सभापती दिपक सूळ यांनी दिलगिरी व्यक्त केली़ बैठकीस सर्व नगरसेवक, अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते़

Web Title: Scrutiny of documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.