नागपूरमधील एक कुटुंब उन्हाळी सुट्टीसाठी मनालीला गेले होते. पण त्यांची ही ट्रीप दु:खात बदलली आहे. कुटुंबातील एक मुलगी झिपलाइनिंग करताना ३० फूट खाली पडली. नागपूरचे रहिवासी असलेलेल प्रफुल्ल बिजवे त्यांची पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत मनालीला गेले होते. ८ जून रोजी झिपलाइनिंग करताना अचानक केबल तुटली आणि त्रिशा थेट खाली पडली.
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
अपघातात त्रिशाच्याच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले. झिपलाइनिंग साइटवर पुरेसे सुरक्षा उपाय नव्हते आणि अपघातानंतरही कोणतीही मदत देण्यात आली नाही, असा आरोप कुटुंबियांनी केला. त्रिशावर प्रथम मनाली आणि नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले.
सध्या तिला नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये मुलगी झिपलाइनिंग करताना दिसत आहे. जेव्हा ती अर्ध्या रस्त्याने पोहोचते तेव्हा दोरीचा हुक तुटतो आणि मुलगी खाली पडते.
त्रिशाच्या वडिलांनी सांगितले की, मुलीची प्रकृती स्थिर आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या मते, त्रिशाची अनेक हाडे मोडली आहेत. नुकतीच तिची शस्त्रक्रिया झाली होती. ती तिच्या कुटुंबासह नागपूरहून मनाली येथे सुट्टीसाठी आली होती.