शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कपिल सिब्बल म्हणताहेत, देशद्रोहाचा कायदा रद्द करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 13:08 IST

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे.

ठळक मुद्देदेशद्रोहाचा कायदा रद्द करा - कपिल सिब्बलदेशद्रोहाच्या कायद्याची वर्तमान काळात आवश्यकता नाही - कपिल सिब्बलकपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

नवी दिल्ली - देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. वर्तमान काळात या कायद्याची आवश्यकता नाही, असेही सिब्बल यांनी ट्विट केले आहे. 

सोमवारी (14 जानेवारी) जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरुन विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसह 10 जणांविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी तयार केलेले हे आरोपपत्र 12,000 पानांचे आहे. 2016मध्ये कन्हैया कुमारसह 10 जणांवर दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या खटल्यांतर्गत आरोप करण्यात आले आहेत. 

या घडामोडींदरम्यान, कपिल सिब्बल यांनी देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची मागणी करणारे ट्विट केले आहे. ''जेव्हा सत्तेत बसलेली लोक संस्थांच्या कामांमध्ये छेडछाड करतात, कायद्याचा दुरुपयोग करतात, हिंसाचार घडवून शांतता आणि सुरक्षेमध्ये बाधा आणतात... वास्तवात या सर्व गोष्टी म्हणजे देशद्रोह'', अशा आशयाचे ट्विट करत सिब्बल यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्विटच्या शेवटी 'सरकार बदला, देश वाचवा', असे आवाहनही देशवासीयांना केले आहे. 

ट्रंकभर पुराव्यांसह कन्हैय्यासहीत 10 जणांविरोधात 1200 पानांचे आरोपपत्र नवी दिल्लीतील जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारी 2016 रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. या संघटनेचं नेतृत्व कन्हैय्या कुमारनं केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारी 2016ला करण्यात आलं होतं. याप्रकरणी तब्बल 3 वर्षांनी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. कन्हैयासह सय्यद उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे. 

 'हम लेके रहेंगे आजादी..., संगबाजी वाली आजादी..., भारत तेरे टुकड़े होंगे..., कश्मीर की आजीदी तक जंग रहेगी..., भारक के मुल्क को एक झटका और दो..., भारत को एक रगड़ा और दो..., तुम कितने मकबूल मरोगे..., इंडियन आर्मी को दो रगड़ा..' आदी घोषणा आरोपपत्रात नमूद करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलseditionदेशद्रोहkanhaiya kumarकन्हैय्या कुमार