उंब्रज, काळवाडी परिसरात बिबट्याची दहशत
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:20+5:302015-02-14T23:51:20+5:30

उंब्रज, काळवाडी परिसरात बिबट्याची दहशत
>उंब्रज : जुन्नर तालुक्यात उंब्रज, काळवाडी, ओतूर, पिंपळवंडी, उदापूर, धोलवड परिसरात बिबट्याची दहशत असून बिबट्याने काही गावांमध्ये नागरिकांवर हल्ले केले असून वनअधिकारी या परिसरात पिंजरे लावण्यास दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये वन अधिकार्यांविषयी नाराजी दिसत आहे. उंब्रज, काळवाडी परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत पसरवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंब्रज येथील निवृत्ती घोलप सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शतपावली करण्यासाठी खंडेराय शिवार परिसरात रस्त्याने जात असताना त्याच्या समोरून बिबट्या रस्ता ओलांडून उसाच्या शेतात गेला, तसेच काळवाडीत गिरजाई शिवार, रानबाई शिवार परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत पसरवली असून या परिसरात बिबट्याने तळच ठोकला आहे. तेथील नागरिकांना बिबट्यामुळे शेतीत काम करण्यास भीती वाटत आहे, असे चंद्रकांत काकडे, मोहन काकडे, शांताराम वामन, विलास वामन, माणिक काकडे, दत्तात्रय वामन, सतीश वामन या नागरिकांनी या परिसरात वनअधिकार्यांना पिंजरे लावण्यासाठी मागणी केली आहे.