स्कॉर्पिअनची लीक कागदपत्रे चिंतेचा विषय नाही - संरक्षणमंत्री
By Admin | Updated: August 26, 2016 18:13 IST2016-08-26T18:13:56+5:302016-08-26T18:13:56+5:30
स्कॉर्पिअन पाणबुडीसंबंधीच्या लीक झालेल्या माहितीची फारशी चिंता करु नका असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी सांगितले.

स्कॉर्पिअनची लीक कागदपत्रे चिंतेचा विषय नाही - संरक्षणमंत्री
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुडीसंबंधीच्या लीक झालेल्या माहितीची फारशी चिंता करु नका असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी सांगितले. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने लीक झालेल्या कागदपत्रांची माहिती वेबसाईटवर टाकली आहे. त्यात स्कॉर्पिअन पाणबुडीच्या शस्त्रास्त्रांसंबंधीची काहीही माहिती नाही असे पर्रिकर यांनी सांगितले.
फ्रान्समधील 'डीसीएनएस' या पाणुबड्यांची बांधणी करणाऱ्या कंपनीची तब्बल २२,००० पानांची कागदपत्रे लीक झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिले होते. चिंतेची बाब म्हणजे, त्या कागदपत्रांमध्ये भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दल गुप्त माहितीचा समावेश असल्याची चर्चा होती.
लीक झालेली कागदपत्रे हा चिंता करण्याचा विषय नसल्याचे नौदलाने आपल्याला आश्वसत केले आहे असे पर्रिकर यांनी सांगितले. स्कॉर्पिअनच्या समुद्रातील सर्व चाचण्याही अजून पूर्ण झालेल्या नाहीत असे त्यांनी सांगितले.