शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला वाचवण्यासाठी गेला अन् परतला नाही... रुग्णालयातून घरी जाणाऱ्या जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:48 IST

गुजरातमध्ये पावसाच्या पाण्यात झालेल्या अपघातात पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Gujarat Accident: गुजरातमध्ये पावसाच्या पाण्यामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी गुजरातमधील अहमदाबाद शहरात मुसळधार पावसात एक मोठा अपघात घडला.रस्त्यावर भरलेल्या पाण्यात अडकल्यानंतर विजेचा धक्का बसल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेचे हृदयद्रावक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. आधी महिलेला विजेचा धक्का बसला आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पतीलाही विजेचा धक्का बसला.

पावसामुळे रस्ता पाण्याने भरला होता. दरम्यान, हे जोडपे त्यांची अ‍ॅक्टिव्हा ओढत रस्ता ओलांडत होते. पण अचानक पाण्यात करंट आला, ज्यामुळे आधी पत्नी पाण्यात अडकली आणि नंतर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीलाही जोरदार विजेचा धक्का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.

नारोळ पोलीस ठाण्याच्या जवळील रुद्र ग्रीन सोसायटीमध्ये राहणारे हे जोडपे त्यांच्या नातेवाईकाला भेटून एलजी हॉस्पिटलमधून परतत होते. मटन गली रोडवर पोहोचताच त्यांची दुचाकी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अडकली आणि दोघेही खाली पडले. दरम्यान महिलेचा  पाण्यात वाहणाऱ्या करंटशी संपर्क आला आणि तिला वाचवण्यासाठी आलेल्या पतीलाही धक्का बसला.

अग्निशमन दल आणि वीज विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर, राजन सिंघल आणि त्यांची पत्नी अंकिता सिंघल यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघातRainपाऊस