डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञांची आवश्यकता

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30

Scientists need DRDO | डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञांची आवश्यकता

डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञांची आवश्यकता

>संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत येणार्‍या विविध प्रयोगशाळांमध्ये विविध पदांवर नवीन शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे. यासंदभार्तील प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यात पहिल्या टप्प्यात १२०० शास्त्रज्ञांची भरती होण्याची शक्यता असल्याची माहिती डीआरडीओच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या संचालक डॉ. हीना गोखले यांनी सोमवारी दिली.
डीआयएटीमधील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. डीआरडीओमध्ये असलेल्या शास्त्रज्ञांच्या कमतरतेबाबत संरक्षणमंत्र्यांनी संसदेत निवेदन दिले होते. नव्या शास्त्रज्ञांच्या भरतीसाठी अर्थमंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यानंतर या नियुक्तीसाठीचा नियमित प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही भरती प्रक्रिया डीआरडीओच्या नियमित भरतीप्रक्रियेसारखीच असेल. यात सुरुवातीला ४०० व त्यानंतर दोन टप्प्यात अन्य ८०० शास्त्रज्ञांची भरती होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

चौकट
शास्त्रज्ञांसाठी नव्याने अभ्यासक्रमांचे आयोजन

डीआयएटीमध्ये आतापयंर्त डीआरडीओ आणि सैन्यदलातील नवनियुक्त शास्त्रज्ञांसाठीच विविध अभ्यासक्रम चालविण्यात येत होते. आता मात्र, गेट परीक्षेतील कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना एम. टेक किंवा पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. यावर्षी ६० विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घेतला आहे. तप पुढील वर्षी ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देता यावा, यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्याचे काम सुरू आहे.

डॉ. सुरेंद्र पाल, डीआयएटीचे कुलगुरु

Web Title: Scientists need DRDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.