शास्त्रज्ञ भारताकडे आकर्षित
By Admin | Updated: September 26, 2014 03:45 IST2014-09-26T02:53:28+5:302014-09-26T03:45:15+5:30
भारताने मंगळयान मोहिमेद्वारे मिळविलेले यश अभिमान वाटायला लावणारे आहे. या मोहिमेतून मंगळाविषयीची गुपिते आपल्याला कळणार आहेत.

शास्त्रज्ञ भारताकडे आकर्षित
पुणे : भारताने मंगळयान मोहिमेद्वारे मिळविलेले यश अभिमान वाटायला लावणारे आहे. या मोहिमेतून मंगळाविषयीची गुपिते आपल्याला कळणार आहेत. त्याबरोबरच जगातील अनेक देश या मोहिमेमुळे भारताकडे आकर्षित झाले आहेत, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
फर्ग्युसन कॉलेज, ज्योतिर्विद्या परिसंस्था, विज्ञान भारती यांच्यातर्फे आयोजित ‘नागरिक जनजागृती : भारताची मंगळयान मोहीम’ या कार्यक्रमात ते बोलत होते. इस्रोचे माजी अध्यक्ष सुरेश नाईक, प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी, प्रा. आर.व्ही. कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये तरुणांना मोठी संधी आहे. या मोहिमेनंतर जगभरातील अनेक देश आपल्याकडे सल्ला घेण्यासाठी येणार आहेत. मात्र, अमेरिका, रशिया, इंग्लंडमधील तरुण जेव्हा भारतात ज्ञानार्जन करण्यासाठी येतील तेव्हा, आपण विश्वगुरू होऊ. एकीकडे ही प्रगती करीत असतानाच देशातील स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्या मिळण्याची गरज आहे, असे भटकर म्हणाले. (प्रतिनिधी)