रचना विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
By Admin | Updated: December 14, 2015 00:17 IST2015-12-14T00:17:44+5:302015-12-14T00:17:44+5:30
नाशिक : महाराष्ट्र समाजसेवा संचलित रचना माध्यमिक विद्यालयात शालेयस्तर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

रचना विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
न शिक : महाराष्ट्र समाजसेवा संचलित रचना माध्यमिक विद्यालयात शालेयस्तर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष विजय डोंगरे, उद्योजक कौस्तुभ मेहता यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापक सुचेता येवला, उपमुख्याध्यापक संगीता टाकळकर, पर्यवेक्षक सुनील गायकवाड, बापू साठे, विजय जाधव, यशवंत ठोके, प्रमोद नागपुरे उपस्थित होते. यावेळी मेहता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांना पडणार्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची सवय ठेवावी. त्यातूनच संशोधनाची आवड निर्माण होते, असे ते म्हणाले. श्रद्धा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नीलेश ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. मणिराम चव्हाण यांनी आभार मानले. प्रयोगशाळा सहायक प्रवीण झगडे, प्राची कोतवाल, नीता घरत, वैशाली कुलकर्णी, स्मिता वसतकर, वंदना पवार, नयना हिरे, सुनीता निगळे यांनी नियोजन केले. फोटो आहे : स्कॅनिंग...कॅप्शन : रचना विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्पांची पाहणी करताना वंदना पवार, सुचेता येवला, विजय डोंगरे, कौस्तुभ मेहता.