विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30
सोलापूर : सम्राट चौक येथील रावजी सखाराम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना श्रीनिवास भैय्या सरवदे मित्र परिवाराच्या वतीने गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप
स लापूर : सम्राट चौक येथील रावजी सखाराम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना श्रीनिवास भैय्या सरवदे मित्र परिवाराच्या वतीने गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गोसावी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दादाराव रोटे, प्राचार्य दिलीप पाटील, मुख्याध्यापक प्रेमलता चांगले, उपप्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, पर्यवेक्षक संजय जगदाळे, चित्रमहर्षी रामचंद्र हक्के, श्रीनिवास सरवदे, अण्णा भालेराव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद भालेराव, नागेश काई, अभी बाबरे, प्रवीण कदम, अतुल सोनकांबळे, सचिन बनसोडे, विक्रांत गायकवाड, योगेश उबाळे, सुनील मस्के, शुभम बाबरे, नितेश जेटीथोर, शुभम वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)फोटो ओळ : रावजी सखाराम हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना विद्यार्थ्यांसमवेत डावीकडून अण्णा भालेराव, प्राचार्य सीताराम गोसावी, प्राचार्य दिलीप पाटील, डॉ. दादाराव रोटे, श्रीनिवास सरवदे, संजय जगदाळे, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, रामचंद्र हक्के आदी.