शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

शालेय मुलीचा असाही आग्रह, खुद्द मुख्यमंत्र्यांनाही टाळता आला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:33 IST

Bhupesh Baghel arranges a helicopter tour : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने गेल्या गुरुवारी एक महत्वाची घोषणा केली आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी गेल्या गुरुवारी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दहावी आणि बारावीच्या टॉपर्सना मोफत हेलिकॉप्टर राईड देणार असल्याचे भूपेश बघेल यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना सवाल करत हेलिकॉप्टरने जाण्याचा आग्रह धरला. यानंतर मुख्यमंत्र्यांनाही तिचा आग्रह टाळता आला नाही. 

छत्तीसगडमधील रघुनाथ नगर (Raghunath Nagar) येथील स्वामी आत्मानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या स्मृती या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 'मी हेलिकॉप्टरमध्ये कधी बसणार' असा सवाल केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, बारावीत टॉप झाल्यावर तुला हेलिकॉप्टरमध्ये बसवले जाईल. मात्र यावर आज मला तुमच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसायचे आहे, असा आग्रह करत स्मृती मुख्यमंत्र्यांसमोर आडून बसली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही तिचा हट्ट टाळता आला नाही आणि त्यांनी आजच तुम्हाला हेलिकॉप्टरमध्ये बसवतो, असे सांगत स्मृती आणि इतर विद्यार्थिंनीसह  हेलिकॉप्टर राईड केली.

दरम्यान, देशभरातील विविध राज्यांमधील दहावी, बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने गेल्या गुरुवारी एक महत्वाची घोषणा केली आहे. बोर्डाच्या परीक्षेतील टॉपर्सना राज्य सरकारतर्फे मोफत हेलिकॉप्टर राईड देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विद्यार्थ्यांसाठी ही मोठी घोषणा केली असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दहावी आणि बारावीच्या टॉपर्सना मोफत हेलिकॉप्टर राईड देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षाछत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल पुढील १५ दिवसांत कधीही जाहीर केले जाऊ शकतात. छत्तीसगड बोर्डाच्या परीक्षेत साधारण साडेसहा लाख उमेदवार बसले होते. यापैकी २ लाख ९३ हजार ६८५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ लाख ८९ हजार ८०८ विद्यार्थी नियमित श्रेणीतील आणि ३ हजार ६१७ विद्यार्थी खासगी आहेत. दुसरीकडे दहावीच्या परीक्षेसाठी ३ लाख ८० हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ६७७ नियमित तर २ हजार ३६० खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी