शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

शाळा विकणे आहे! देशातील हजार शाळांना कोरोना साथीचा फटका, शिक्षण क्षेत्राची दैन्यावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:34 IST

देशातील शिक्षण क्षेत्रातील सद्य:स्थितीबद्दलची माहिती सेरेस्ट्रा व्हेंचर्स या संस्थेने गोळा केली आहे. त्याच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

हैदराबाद : कोरोना साथीमुळे देशातील इतर क्षेत्रांबरोबरच शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे देशातील सुमारे एक हजार शाळांच्या इमारती त्यांच्या संचालकांनी विकायला काढल्या आहेत. त्यातून येत्या दोन ते तीन वर्षांत ७५०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

देशातील शिक्षण क्षेत्रातील सद्य:स्थितीबद्दलची माहिती सेरेस्ट्रा व्हेंचर्स या संस्थेने गोळा केली आहे. त्याच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विकायला काढलेल्यांपैकी बहुतेक शाळा खासगी असून, तिथे कमाल वार्षिक फी ५० हजार रुपये होती. या शाळांत केजी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालतात. देशात ८० टक्के शाळा या खासगी आहेत.

सेरेस्ट्रा व्हेंचर्सचे भागीदार विशाल गोयल यांनी सांगितले की, खासगी शाळांनी एखाद्या विद्यार्थ्याकडून ५० हजार रुपयांपेक्षा जास्त वार्षिक फी घेऊ नये अशी मर्यादा सरकारने घालून दिली होती. मात्र, या शाळांना शिक्षकांचे पगार द्यावे लागतात. शाळेचे व्यवस्थापन करताना इतर अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात. या भारामुळे सुमारे हजार शाळांचे अस्तित्व याआधीच पणाला लागले होते. कोरोना साथीमुळे शाळांसमोरील संकटात भरच पडली. त्यामुळे अनेक संचालकांना शाळेची इमारत विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

गोयल म्हणाले, शाळा चालविणाऱ्यांना कर्जे देण्यास बँका नाखुश असतात. कोरोनाच्या साथीमुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक शाळांना आपले अस्तित्व टिकेल का याची चिंता आहे. काही खासगी शाळांनी आपल्या शिक्षकांचे पगार ७० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत.

महाराष्ट्रातील शाळाहीमहाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकमध्ये २० ते २५ शाळा खरेदीदारांच्या शोधात आहेत. आॅक्रिज्ड इंटरनॅशनल हा साखळी शाळासमूह हाँगकाँगच्या नॉर्थ अँग्लिया एज्युकेशन या संस्थेने २०१९ मध्ये १६०० कोटी रुपयांना विकत घेतला होता. मात्र, आता विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शाळांच्या इमारतीच्या किमतीत ३० ते ४० टक्के घट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रcorona virusकोरोना वायरस बातम्या