वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेला मदत
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30
दावडी : वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथ मुलांना एक महिन्याचे धान्य व दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून मांजरेवाडी (ता. खेड) येथील युवक विलास मांजरे यांनी आदर्श उपक्रम सुरू केला आहे.

वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेला मदत
द वडी : वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथ मुलांना एक महिन्याचे धान्य व दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून मांजरेवाडी (ता. खेड) येथील युवक विलास मांजरे यांनी आदर्श उपक्रम सुरू केला आहे.मांजरेवाडी, रेटवडी, खरपुडी, तिन्हेवाडी, टाकळकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दोन हजार वावाटप करण्यात आल्या. पांगरी व निमगाव येथील अनाथाश्रमातील मुलांना एक महिना पुरेल इतके धान्य देण्यात आले. वसंतराव मारुतीराव मांजरे विद्यालयातील प्राजक्ता संभाजी मांजरे ही विद्यार्थिनी दहावीत प्रथम आल्यामुळे तिच्या पुढील शिक्षणासाठी पाच हजार रुपये मदत देण्यात आली. तसेच, मांजरेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, अरुण चांभोरे, वैभव घुमटकर, नवनाथ होले, गणेश थिगळे, कैलास सांडभोर, उदयबापू पाचर्णे, अशोक राक्षे, बापूसाहेब चौधरी, साळूबाई मांजरे, सचिन सावत, राहुुल मांजरे, रवींद्र गरुड, भगवान मांजरे, काळूराम मांजरे, आनंदा काळे, उमेश गाडे, संदीप गाडे, नितीन राक्षे, दिलीप करंडे, अशोक मांजरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो : मांजरेवाडी (ता.खेड) येथील युवक विलास मांजरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.