शालेय विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30
तळेगाव ढमढेरे : आर. बी. गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांनाही समजावे, या उद्देशाने संदेशफलक व वृक्ष घेऊन वृक्षदिंडी काढली. समारोप गीताई कार्यालयात झाला. या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे, तहसीलदार राजेंद्र पोळ, ग्रामपंचायत सदस्य सुधीर ढमढेरे, मुख्याध्यापक माणिक सातकर, बबन बोरूडे, जगदीश राऊतमारे, नितेश पवार आदी उपस्थित होते. प्रशालेच्या मुलींनी पर्यावरणाची राखी एका वृक्षाला बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. या वेळी ७०० राख्या सैनिक बांधवांना पाठवण्यात आल्या. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शालेय विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी
त ेगाव ढमढेरे : आर. बी. गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांनाही समजावे, या उद्देशाने संदेशफलक व वृक्ष घेऊन वृक्षदिंडी काढली. समारोप गीताई कार्यालयात झाला. या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे, तहसीलदार राजेंद्र पोळ, ग्रामपंचायत सदस्य सुधीर ढमढेरे, मुख्याध्यापक माणिक सातकर, बबन बोरूडे, जगदीश राऊतमारे, नितेश पवार आदी उपस्थित होते. प्रशालेच्या मुलींनी पर्यावरणाची राखी एका वृक्षाला बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. या वेळी ७०० राख्या सैनिक बांधवांना पाठवण्यात आल्या. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.फाटो ओळ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे गुजर प्रशालेच्या विद्यार्थिनींनी पर्यावरणाचा संदेश देणारी राखी वृक्षाला बांधली. या वेळी उपस्थित विद्यार्थिनी व शिक्षकवृंद.