भिंतीवर आपटल्याने विद्याथ्र्याचा मृत्यू
By Admin | Updated: November 11, 2014 02:21 IST2014-11-11T02:21:55+5:302014-11-11T02:21:55+5:30
इंग्रजीत बोलला नाही म्हणून एका शिक्षिकेने बेदम मारहाण केल्यामुळे इयत्ता पहिलीत शिकणा:या सहावर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

भिंतीवर आपटल्याने विद्याथ्र्याचा मृत्यू
शिक्षिकेचे क्रौर्य : आंध्र प्रदेशातील घटना; पहिलीचा विद्यार्थी
नालगोंडा : इंग्रजीत बोलला नाही म्हणून एका शिक्षिकेने बेदम मारहाण केल्यामुळे इयत्ता पहिलीत शिकणा:या सहावर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना शनिवारी आंध्र प्रदेशच्या नालगोंडा जिल्हय़ातील तिरुमालागुरी येथे घडली आहे.
या घटनेनंतर पालक आणि गावातील लोकांनी खासगी शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत शाळेला घेराव घातला. संतप्त जमावाने या मुलाचा मृतदेह शाळेच्या प्रवेशद्वारावरच ठेवला व शिक्षिका व मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाई होईर्पयत मृतदेह न हलविण्याची धमकी दिली.
पोलिसांनी सांगितले की, चंदूला सुमती नावाच्या शिक्षिकेने इंग्रजी येत नाही म्हणून बेदम मारहाण केली. यावेळी तिने चंदूचे डोके भिंतीवर आपटले. यात त्याच्या डोक्याला आतून मार बसला. शाळा सुटल्यावर चंदू कसाबसा घरी परतला व लगेच आजारी पडला. रात्री त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला हैदराबादला हलविण्यात आले. रविवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ‘शिक्षिकेला जन्मठेपच झाली पाहिजे. इंग्रजीत बोलत नाही म्हणून तिने या मुलाचे डोके भिंतीवर आपटले. हा मुलगा तेलगू बोलत होता. त्यामुळे शिक्षिका संतापली आणि तिने त्याला बेदम मारहाण केली,’ असे बाल हक्क कमिटीच्या अनुराधा राव म्हणाल्या. या शाळेची मान्यताही रद्द करण्याची मागणी राव यांनी केली. (वृत्तसंस्था)