मैलाशुध्दीकरण केंद्रातील कामगारांची ससेहोलपट

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:10+5:302015-02-13T23:11:10+5:30

पुणे: भैरोबा नाला येथील मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये काम करीत असलेल्या ५० कंत्राटी कामगारांना ठेकेदाराकडून अत्यंत कमी वेतन दिले जाते तसेच घाणभत्ता देणे आवश्यक असताना तो दिला जात नसल्याने त्यांची मोठी परवड होत आहे, त्यांनी शुक्रवारी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन याबाबत दाद मागितली.

Scavenging workers | मैलाशुध्दीकरण केंद्रातील कामगारांची ससेहोलपट

मैलाशुध्दीकरण केंद्रातील कामगारांची ससेहोलपट

णे: भैरोबा नाला येथील मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये काम करीत असलेल्या ५० कंत्राटी कामगारांना ठेकेदाराकडून अत्यंत कमी वेतन दिले जाते तसेच घाणभत्ता देणे आवश्यक असताना तो दिला जात नसल्याने त्यांची मोठी परवड होत आहे, त्यांनी शुक्रवारी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन याबाबत दाद मागितली.
भैरोबा नाला येथे सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च करून महापालिकेने मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभा केला. या ठिकाणी सुमारे पन्नास कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. याठिकाणी ५० कामगार घाणीमध्ये काम करीत आहेत. त्यांचा ३ ते ४ महिन्यांचा पगार थकित असल्याची तक्रार त्यांनी कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून त्याचा ठेका रदद् करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे कामगारांनी सांगितले. कुणाल कुमार यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्यास संबंधित अधिकार्‍यांना सांगितले असल्याचे ज्ञानेश्वर माने, सखाराम पळसे, सुनील पवार यांनी सांगितले.
..........................

Web Title: Scavenging workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.