शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

SC/ST Protection Act: सर्वोच्च न्यायालय कायदा बनवू शकत नाही, केंद्राचा पवित्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 18:13 IST

सर्वोच्च न्यायालयात आज SC/ST अॅक्टवर सुनावणीदरम्यान जोरदार चर्चा झाली. SC/ST अॅक्टमध्ये FIRच्या माध्यमातून कोणालाही खोट्या गुन्हात अडकवता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात आज SC/ST अॅक्टवर सुनावणीदरम्यान जोरदार चर्चा झाली. SC/ST अॅक्टमध्ये FIRच्या माध्यमातून कोणालाही खोट्या गुन्हात अडकवता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. तसेच गरज असल्यासच त्याला अटक करण्यात यावी, असंही न्यायालय म्हणालं. त्यावर केंद्र सरकारकडून न्यायालयात उपस्थित असलेले महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.केंद्राच्या या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालयानं खोडून काढलं आहे. या देशात जगण्याचा अधिकार न्यायालय लागू करणार नसेल तर मग कोण करणार ?, न्यायालय स्वतःच्या अधिकारांचा वापर करून लोकांच्या जगण्याचा अधिकार लागू करू शकत नाही काय ?, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला चुकीच्या पद्धतीनं घेण्यात आलं आहे.  केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारने केलेल्या याचिकांवर न्या. ए. के. गोयल व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आज प्रामुख्याने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १५ मे रोजी ठेवण्यात आली.हा विषय मोठ्या खंडपीठाकडे सोपवावा, असेही वेणुगोपाल यांचे म्हणणे होते. न्यायालयाने दिलेला निकाल सपशेल चुकीचा आहे. न्यायालयाने कायदेमंडळाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे याचिकांवर अंतिम निकाल होईपर्यंत निकालास स्थगिती द्यावी, अशी अ‍ॅटर्नी जनरलनी मागणी केली. एवढेच नव्हे तर निकालानंतर दलितांवरील अत्याचार वाढले आहेत, असेही ते म्हणाले. या निकालाने सामाजिक स्वास्थ्य बिघडून देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असेही त्यांचे म्हणणे होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय