शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

SBI Recruitment 2020: अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; SBI मध्ये शेकडो पदांवर भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 10:02 AM

Government Bank Jobs: बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत. 

SBI SO Recruitment 2020, Sarkari Naukri Job 2020: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध असून अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या भरतीमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या रिक्त असलेल्या 452 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ११ जानेवारीपर्यंत उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. 

बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत. 

शैक्षणिक अटमॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्टॅटिक्स किंवा गणित किंवा अर्थशास्त्रामध्य़े पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी. यामध्ये ६० टक्क्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. MBA, MGDM आणि BTech पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी 21 ते 35 वर्षे आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 28 ते 30 वर्षे आहे. इंजिनिअर पदांसाठी 40 वर्षे आहे. यासाठी 23 हजार ते 51 हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे. 

कोणत्या पदांवर भरती....

  • एसबीआयने मॅनेजर व डेप्युटी मॅनेजर मार्केटिंगमध्ये 38 जागांसाठी भरती काढली आहे. 
  • मॅनेजर क्रेडिट प्रोसिजर्सच्या दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 
  • असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि अन्य अशा 236 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट आणि टेक्निकल लीड या पदांसाठीही अर्ज मागविण्यात आले आहेत. 
  • एसबीआयने जाहिरात क्रमांक CRPD/SCO/2020-21/29 जारी करत 100 असिस्टंट मॅनेजर (सिक्यूरिटी एनॅलिस्ट) आणि डेप्युटी मॅनेजर (सिक्यूरिटी एनॅलिस्ट) या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. 
  • नेटवर्क सिक्यूरिटी स्पेशलिस्टसाठी मॅनेजर आणि नेटवर्क राउटिंग अँण्ड स्विचिंग स्पेशलिस्टसाठी मॅनेजर अशा 32  पदांसाठी अर्ज मागविले आहेत. 
  • इंटर्नल ऑडिटसाठी CRPD/SCO/2020-21/31 द्वारे डेप्युटी मॅनेजरच्या 28 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. 
  • एसबीआयने इंजिनिअर फाय़रसाठी 16 जागांवर अर्ज मागविले आहेत. 

 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...

 

SSC CGL Notification 2020: केंद्र सरकारच्या या विभागात नोकरीची संधी, ६ हजार ५०६ पदांसाठी निघालीय भरती

स्टाफ सिलेक्शन कमिटी (एसएससी) ने एसएससी सीजीएल २०२० साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्याबरोबरच एसएससी-सीजीएल परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एसएससी सीजीएल २०२० च्या टीयर १ ची परीक्षा २९ मे पासून ७ जून २०२१ दरम्यान आयोजित होणार आहे.ही परीक्षा संगणकावर आधारित असेल. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ssc.nic.in  वर देण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनच्या आधारावर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख ३१ जानेवारी २०२१ निर्धारित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील एकूण सहा हजार ५०६ पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रुप बीमधील गॅझेटेड श्रेणीतील २५० पदे, ग्रुप बीमध्ये नॉन गॅझेटेड श्रेणीची ३ हजार ५१३ पदे आणि ग्रुप सी मधील २ हजार ७४३ पदांची भरती होणार आहे.

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाgovernment jobs updateसरकारी नोकरी