बॉम्बच्या दूरध्वनीने सावंतवाडी, कुडाळात खळबळ
By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:04+5:302015-08-14T23:35:04+5:30
बॉम्बच्या दूरध्वनीने सावंतवाडी, कुडाळात खळबळ

बॉम्बच्या दूरध्वनीने सावंतवाडी, कुडाळात खळबळ
ब म्बच्या दूरध्वनीने सावंतवाडी, कुडाळात खळबळन्यायालयांची झाडाझडती : सुरक्षा यंत्रणेची सतर्कतासावंतवाडी/कुडाळ : सावंतवाडी व कुडाळ न्यायालयात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी दूरध्वनीने जिल्हा पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. पणजी नियंत्रण कक्षाकडे आलेल्या दूरध्वनीची माहिती सिंधुदुर्गच्या पोलीस यंत्रणेला देण्यात आल्यानंतर कुडाळ व सावंतवाडी न्यायालये खाली करून तेथील आवाराची बॉम्ब शोधक पथकामार्फत तपासणी करण्यात आली; पण काहीच संशयास्पद आढळले नसल्याने ही अफवा असल्याचे सिध्द झाले. निनावी दूरध्वनी करणार्याचा सिंधुदुर्ग पोलीस शोध घेत आहेत. स्थानिक पोलिसांनी सावंतवाडी आणि कुडाळ न्यायालयांत धाव घेत न्यायालयासह परिसर रिकामा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी 11 वा.च्या सुमारास पणजी नियंत्रण कक्षाला निनावी फोनद्वारे ही माहिती देण्यात आली. पणजी नियंत्रकांनी तत्काळ ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दूरध्वनीवरून कळविली. ओरोसहून तत्काळ बॉम्ब शोधक पथक कुडाळ येथे रवाना करण्यात आले. न्यायालय व परिसराची या पथकामार्फत तपासणी करण्यात आली. या वेळी श्वान पथकासही पाचारण करण्यात आले; पण दीड तासाच्या तपासणीनंतरही संशयास्पद अशी काहीच वस्तू आढळली नाही. शेवटी न्यायाधीशांची गाडीही तपासण्यात आली; पण तेथेही काही आढळले नाही. न्यायालयाचे कामकाज जवळपास तीन तास थांबविण्यात आले. न्यायालयातील सर्व कर्मचारी न्यायालयापासून एक किलोमीटर अंतरावर थांबले होते. चौकटगाडीची दुरुस्ती आणि तपास कुडाळ न्यायाधीशांच्या गाडीत कित्येक दिवस बिघाड होता. तो दुरुस्तीसाठी तीन दिवसांपूर्वीच एका गॅरेजमध्ये गाडी लावली होती. ती आजच वापरात आली होती. त्यामुळे या पथकाने गाडीची पंधरा मिनिटे कसून तपासणी केली.सावंतवाडीत तीन तासांनंतर पथक दाखलन्यायालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्यानंतर न्यायालय क्षणार्धात खाली करण्यात आले. प्रत्येकजण काहीतरी भीषण घडेल, या भीतीत वावरत होता; पण कुडाळ येथील तपासणी पूर्ण करून तब्बल तीन तासांनंतर बॉम्बशोधक पथक दाखल झाले.कोट: पणजी नियंत्रकांमार्फत आलेल्या दूरध्वनीनंतर आमची यंत्रणा कार्यान्वित झाली. तपासाअंती काही मिळाले नसले, तरी जिल्हा यंत्रणेत मात्र यामुळे खळबळ उडाली. शेवटी या ठिकाणी काहीही संशयास्पद सापडले नाही, अशी प्रतिक्रिया बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख दिलीप पाटील यांनी दिली. संशयित सावंतवाडीचाचदरम्यान, या घटनेचा गोवा येथे करण्यात आलेल्या दूरध्वनीचा तपास पोलीस यंत्रणोने जलदगतीने केला असून, दूरध्वनी करणारा हा सावंतवाडीतीलच कुणीतरी असल्याचे पुढे आले आहे; पण पोलिसांनी याबाबत स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. (वार्ताहर)