सावनेर... सिंगल
By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:48+5:302015-01-23T01:03:48+5:30
राम गणेश गडकरी पुण्यतिथीनिमित्त सावनेरात आज विविध स्पर्धा

सावनेर... सिंगल
र म गणेश गडकरी पुण्यतिथीनिमित्त सावनेरात आज विविध स्पर्धासावनेर : स्थानिक राम गणेश गडकरी स्मारक संघर्ष समितीतर्फे कै. राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रम व मिनी मॅरेथॉन, सायकल रेस आदी स्पर्धांचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या हस्ते केले जाईल. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक एम. के. मजुमदार, ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, माजी आ. एस.क्यू. जमा, उपक्षेत्रीय प्रबंधक आर.एस. सिंह, डॉ. सत्यनारायण शर्मा, व्ही.के. सिंग, डॉ. गोपाल बेले, देवेंद्र तिवारी आदींची उपस्थिती राहणार आहे.मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्काराने गौरविले जाणार असून या स्पर्धेत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी ३ वाजता वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता समाजसेवी व साहित्यिकांचा सत्कार तसेच सायंकाळी ७ वाजता हास्य कविसंमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. सर्व स्पर्धा व कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अरुण रुषिया यांनी केले आहे. (तालुका/प्रतिनिधी)