बचत गट गँगचा महिलेवर हल्ला

By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:26+5:302015-08-10T23:28:26+5:30

बचत गट गँगचा महिलेवर हल्ला

Savings Group gang attacked the woman | बचत गट गँगचा महिलेवर हल्ला

बचत गट गँगचा महिलेवर हल्ला

त गट गँगचा महिलेवर हल्ला
घरात तोडफोड, शांतीनगर येथील घटना

नागपूर :
महिला बचत गटाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत शांतीनगर येथे बचत गट चालवणाऱ्या महिलांनी कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे एका महिलेला मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजता घडली. पीडित ललीता राजेश संतापे ही शांतीनगर येतील नयापुरा येथे राहते. ललीता मोलकरणीचे काम करते. तिने बचत गटाकडून कर्ज घेतले होते. तिला १५ दिवसानंतर एक हजार रुपये हप्ता द्यावयाचा होता. सोमवारी दुपारी बचत गट चालवणाऱ्या तीन महिला ललीताकडे आल्या. त्यांनी तिला कर्जाचा हप्ता देण्यास सांगितले. परंतु सध्या आपण हप्ता देऊ शकत नाही, असे तिने सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. बचत गटाच्या महिलांनी ललीताला मारहाण केली. तसेच घरातील टीव्ही आणि फर्नीचरही तोडले. तिच्या मुलांनाही मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तनाव निर्माण झाला आहे.

Web Title: Savings Group gang attacked the woman