शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satyapal Malik : PM नरेंद्र मोदींचा मार्ग योग्यच, सत्यपाल मलिकांनी घेतला यु-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:56 IST

Satyapal Malik : मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोदींसंदर्भातील विधानावरुन युटर्न घेतला आहे. मोदी हे योग्य मार्गावर आहेत, असे म्हणत शेती विधेयक परत घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले

ठळक मुद्देमलिक यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. या भेटीनंतर काय झाले, त्याविषयीही त्यांनी सांगितले. मी नेहमीच पंतप्रधानांचे म्हणणे, विचार जनतेपर्यंत पोहोचवत आलोय.

नवी दिल्ली - शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर सुरु होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) माझी भेट झाली तेव्हा ते खूप अहंकारात होते. ५ मिनिटांत माझ्यात आणि त्यांच्यात वाद झाला. ते खूप गर्विष्ठ आहेत. जेव्हा मी त्यांना सांगितले आमचे ५०० जण मृत्यू पावलेत, तेव्हा माझ्यासाठी मेलेत का? असा प्रश्न त्यांनी केला, असे खळबळजनक विधान मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला होता. मलिक यांनी आता आपल्या विधानावरुन सारवासारव केली आहे. 

मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोदींसंदर्भातील विधानावरुन युटर्न घेतला आहे. मोदी हे योग्य मार्गावर आहेत, असे म्हणत शेती विधेयक परत घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि अमित शहांचे संबंध अतिशय चांगले आहेत, शहा यांनी मोदींबाबत काहीही विधान केले नाही. शहांनी मोदींबद्दल केलेल्या विधानाच्या, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असेही मलिक यांनी म्हटले. दरम्यान, सत्यपाल यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर, मोदींना काही लोकांनी चुकीची माहिती दिली आहे, आपण त्यांना भेटत जावे, एकदिवस त्यांना सर्वकाही समजेल, असे अमित शहांनी बोलताना म्हटल्याचे मलिक यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी युटर्न घेतला आहे. 

मलिक यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. या भेटीनंतर काय झाले, त्याविषयीही त्यांनी सांगितले. मी नेहमीच पंतप्रधानांचे म्हणणे, विचार जनतेपर्यंत पोहोचवत आलोय. जेव्हा मी त्यांना भेटलो. तेव्हा ते खूप हट्टीपणा दाखवत होते. पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून मी अमित शाह यांना भेटलो. अमित शाह पंतप्रधान मोदींचा खूप सन्मान आणि आदर करतात, असे म्हणाले. 

मोदींना भेटायची हिंमत झाली नाही

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत झालेल्या प्रकारानंतर पुन्हा त्यांना भेटायची माझी हिंमत झाली नाही. तुम्ही आमच्यासाठी योग्य व्यक्ती नाही, असे मला सांगितले असते, तर एका मिनिटात राज्यपालपद सोडले असते. तशी मनाची तयारी मी केली होती, असे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांचे गावागावांमध्ये जाणे कठीण झाले होते. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात कोणताही मंत्री जाऊ शकत नव्हता. तेथील जनता पंतप्रधानांचा खूप आदर करते, ही बाब वेगळी आहे. मात्र, हरियाणामध्ये तर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले नाही.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीAmit Shahअमित शाह