शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

धोकादायक कृत्रिम सरोवरातून पाणी काढून देण्याचा प्रयत्न; घटनास्थळी तुकड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 07:55 IST

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर मंडळी या सरोवरातील पाणी भगदाड पाडून काढून देता येईल का या प्रयत्नांत आहेत.

नवी दिल्ली : हिमकडा सात फेब्रुवारीला कोसळून जो मलबा तयार झाला त्यातून बनलेल्या ‘धोकादायक’ अशा सरोवराचे नेमके ठिकाण हाय रिझोल्युशन उपग्रहाच्या प्रतिमांनी शोधून काढले आहे. या हिमकड्याने काही लोकांचा मृत्यू झाला असून २०० जण अजूनही बेपत्ता आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर मंडळी या सरोवरातील पाणी भगदाड पाडून काढून देता येईल का या प्रयत्नांत आहेत. परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी तुकड्या सरोवराच्या दिशेने आधीच निघाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी तुकड्या त्या भागांत हेलिकॉप्टर्समधून गेल्या. ड्रोन्स, मानवरहित विमाने, संबंधित संस्था नेमकी परिस्थिती काय आहे याची पाहणी करीत आहेत, असे एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करता येईल, असे प्रधान म्हणाले.सरोवर फुटबॉल मैदानाच्या तीनपटया कृत्रिम सरोवराचे व्हिडिओज हेलिकॉप्टर्सनी घेतले आहेत. हा सरोवर फुटबॉल खेळाच्या मैदानाच्या आकाराच्या तीनपट आहे. उपग्रहाच्या प्रतिमांतून हे दिसते की, ऋषी गंगा नदीवर खड्डा पडला असून तो खूप वेगाने वाहणाऱ्या रोनती नदीच्या पाण्याने भरून गेला आहे. ऋषी गंगा ही त्यामुळे तपोवन वीज प्रकल्पाच्या दिशेने वाहत आहे. हिमनगाचा काही भाग तुटून नदीत पडला.त्याने मोठे दगड, मलबा व फार मोठ्या प्रमाणात गाळ वाहून सोबत नेला व त्यामुळे दोन वीज प्रकल्प वाहून गेले. वाढलेले पाणी आणि मलब्यामुळे तयार झालेली भिंत काळजीचे कारण आहे. पाण्याच्या वजनामुळे भिंतीचे तुकडे होऊन दुसरा पूर येतो का हा नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा