सतरा महिन्याच्या बालकाचा मृत्यू उपचारात हलगर्जीपणाचा आरोप : इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळ्याला
By Admin | Updated: January 9, 2016 23:23 IST2016-01-09T23:23:23+5:302016-01-09T23:23:23+5:30
जळगाव: चिरायु हॉस्पिटलला दाखल असलेल्या तन्मय गोपाळ भवरे (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या सतरा महिन्याच्या बालकाचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला आहे. चिरायु व अमेय हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या चुकीच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, या आरोपामुळे बालकाचा मृतदेह धुळे वैद्यकीय महाविद्यालयात इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सतरा महिन्याच्या बालकाचा मृत्यू उपचारात हलगर्जीपणाचा आरोप : इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळ्याला
ज गाव: चिरायु हॉस्पिटलला दाखल असलेल्या तन्मय गोपाळ भवरे (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या सतरा महिन्याच्या बालकाचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला आहे. चिरायु व अमेय हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या चुकीच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, या आरोपामुळे बालकाचा मृतदेह धुळे वैद्यकीय महाविद्यालयात इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रामेश्वर कॉलनीतील रहिवाशी गोपाळ रामकृष्ण भवरे हे खेडी खुर्द येथील हायस्कुलमध्ये शिपाई आहेत. एक डिसेंबर रोजी त्यांचा मुलगा तन्मय याला ताप आल्याने त्यांनी सागर पार्कजवळील राजेश शिंपी यांच्या अमेय हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन देऊन घरी पाठविले. नंतर इंजेक्शन दिल्याच्या जागेवर त्याला गाठ झाली. डॉक्टरांनी बर्फाने शेकण्याचा सल्ला दिला. परंतु तरीही फरक पडला नाही. इन्फेक्शन झाल्याने भवरे यांनी त्याला डॉ.नंदीनी आठवले यांच्या सल्ल्याने ३ डिसेंबर रोजी चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शनिवारपर्यंत त्याच्यावर उपचार झाले. या दरम्यान बालकावर शस्त्रक्रियाही झाली. त्यासाठी सव्वा लाख रुपये खर्च केला. शनिवारी दुपारी बालकाचा मृत्यू झाला. गोपाळ भवरे यांनी चिरायु व अमेय हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर आरोप केले. कोट..आम्ही इंजेक्शन दिले तेव्हा त्याला सेप्टिक झाले नव्हते. चिरायुला भूल दिल्यानंतर बाळ शुध्दीवर आलेच नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू कसा झाला हे चिरायुचे डॉक्टरच सांगू शकतील. माझ्याकडून चूक झालेली नाही. त्या काळात मी बाहेर गावीच होतो.-डॉ.राजेश शिंपी