उघड्यावर पडले संसार-२

By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:03+5:302015-08-14T23:35:03+5:30

त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची घरे तुटली आहेत. घरातील वस्तू बाहेर काढून ठेवण्यात आले आहेत.

Sasar-2 falls open | उघड्यावर पडले संसार-२

उघड्यावर पडले संसार-२

यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची घरे तुटली आहेत. घरातील वस्तू बाहेर काढून ठेवण्यात आले आहेत.
येथील नागरिक मजुरी करणारे आहे. या परिस्थितीत त्यांना कामावर जाणे शक्य नसल्याने त्यांची रोजीही बुडाली आहे.

बॉक्स..
सर्वत्र चिखल, दुर्गंधी पसरली
गोदावरी व गंगानगर झोपडपट्टीत आता सर्वत्र चिखल पसरला आहे. घरातील चिखल बाहेर काढण्याचे काम प्रत्येक घरात सुरू होते. चिखलामुळे दुर्गंधी सुद्धा पसरली असून रोगराईची भीती निर्माण झाली आहे.

बॉक्स..
नाल्याच्याच पाण्याने धुणीभांडी
शुक्रवारी येथील नागरिकांना कसाबसा दिलासा मिळाला. त्यामुळे घरातील वस्तू व चिखल बाहेर काढून धुणीभांडी करण्यात आली. परंतु नळांना पाणी नसल्याने नाल्याच्याच पाण्याने धुणीभांडी करावी लागली.

बॉक्स..
शिलाई मशीन नव्हे रोजगारच हिरावला
गोदावरी नगर येथील अब्दुल सत्तार यांची पत्नी नजमा यांची शिलाई मशीन पुरात वाहून गेली. ही शिलाई मशीन म्हणजे त्यांचे रोजगाराचे साधन होते. त्या कपडे शिवून घर चालवण्यासाठी पतीला मदत करीत होत्या. घरातील साहित्य पाण्यात भिजले. घर तुटले. काही वाहून गेले. याचे त्यांना दु:ख आहेच परंतु शिलाई मशीन गेल्याचे अधिक दु:ख आहे. माझी शिलाई मशीन नव्हे तर माझा रोजगारच हिरावला असल्याची व्यथा त्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.

बॉक्स..
नगरसेवकाने दिली भेट
दरम्यान शुक्रवारी दुपारी या प्रभागातील नगरसेवक भूषण शिंगणे यांनी झोपडपट्टीला भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले.

Web Title: Sasar-2 falls open